सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुमच्या खर्चाचं शहाणपणानं नियोजन करा. मिळकतीपेक्षा खर्च जास्त असू शकतो. थोडी डोकेदुखी किंवा अस्वस्थपणा येऊ शकतो. तुमचा दिवस नेहमीप्रमाणेच घालवा आणि कृती नंतर करा.
LUCKY SIGN – A blue sapphire
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
आजचा दिवस अगदी घाईगडबडीचा असू शकतो. तसंच तुम्ही कदाचित मार्केटलाही भेट देऊ शकता. दिवसाच्या उत्तरार्धात तुमची ऊर्जा कामी येऊ शकते. बाहेर अति खाणं टाळू शकता. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
LUCKY SIGN – A silicon mould
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमच्या रिलेशनशिपमधून अति अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो. ते तुमच्या बाजूने नसेल, तर सध्या ते जाऊ दे. त्याकडे लक्ष देऊ नका. काहीतरी नवीन शिकून तुम्ही स्वत:लाच आश्चर्याचा धक्का द्याल.
LUCKY SIGN - A sand rose stone
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्या प्रलंबित कायदेशीर प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. निघणारा तोडगा तुमच्यासाठी चांगला असेल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल. आजचा दिवस कामाला प्राधान्य देण्याचा आहे.
LUCKY SIGN - A yellow citrine
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या प्रेमळपणानं तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. कामासाठी आणि प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अगदी प्रसन्न आहे. ओळखीतलं कुणी तरी तुम्हाला नवीन ऑफर देऊ शकेल. तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या.
LUCKY SIGN – A pyrite
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
आज तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करा आणि ती एरव्हीपेक्षा लवकर पूर्ण होऊ शकते. आजचा दिवस काम करण्याचा आणि मानसिकरीत्या सजग राहण्याचा, सतत कार्यरत राहण्याचा आहे. तुम्ही काही दीर्घकालीन योजनांचाही विचार करू शकता.
LUCKY SIGN – A black crystal
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्यांच्या संपर्कात नाही अशा मित्रांपर्यंत पोहोचण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला काही वेळ एकट्याने घालवण्याचीही गरज भासेल. येत्या काळात तुम्ही भरपूर बिझी असाल, असं एकूणच तुमच्या ऊर्जेवरून स्पष्ट दिसतं. त्यामुळे आता काही वेळ आराम करा, रिलॅक्स व्हा.
LUCKY SIGN – A dreamcatcher
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमची वैयक्तिक कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही आत्ता जो बदल करण्याचं ठरवलं आहे त्याची फळं तुम्हाला खूप लांबच्या काळातही मिळतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी कदाचित एखादी नवीन यंत्रणा तयार कराल. त्यामुळे तुम्हाला काही टीकेलाही सामोरं जावं लागू शकतं.
LUCKY SIGN – A rose quartz
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
लोकांना भेटून, फोटो पाहून किंवा फोनवरून बोलून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला कदाचित मानसिकरीत्या थकल्यासारखंही वाटेल. एखादा मैदानी व्यायाम किंवा ध्यानधारणाने शांतता मिळू शकते.
LUCKY SIGN – A blue tourmaline
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आजचा दिवस व्हर्च्युअल किंवा प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्याचा म्हणजेच शॉपिंगचा आहे. कदाचित कौटुंबिक गरजेमुळे एखादा छोटा प्रवासही घडू शकेल. तुमच्या अनुपस्थितीत तुमचं काम नियंत्रणात असेल याची खात्री करून घ्या. माहिती नसलेल्या किंवा विश्वासार्ह नसलेल्या ठिकाणांमध्ये खाणं टाळा.
LUCKY SIGN – A Lush Garden
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखाद्या गोष्टीचा सराव किंवा रिहर्सल्समध्ये आजच्या दिवसातला बऱ्यापैकी वेळ जाईल. विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक यांचा आजचा दिवस तर नेहमीपेक्षाही गडबडीचा असेल. कामाच्या ठिकाणी एखादी सकारात्मक गोष्ट अपेक्षित आहे.
LUCKY SIGN – A rose gold ring
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखादा नुकताच झालेला गोंधळ निस्तारला जाईल. एखादी भागीदारी असेल तर त्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन वाहन घ्यायचं ठरवत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अगदी योग्य आहे. कोणत्याही प्रकारचे द्वेष मनात न ठेवण्याचा सल्ला लक्षात ठेवा.
LUCKY SIGN – A feather
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.