मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: मिथुन राशीची होईल इच्छापूर्ती; कसा असेल 19 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: मिथुन राशीची होईल इच्छापूर्ती; कसा असेल 19 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुमच्या मनात जी असुरक्षिततेची भावना आहे, भावनिक दुर्बलता आहे आणि विश्वासाचे मुद्दे आहेत, त्यावर नियंत्रण ठेवा. कामामुळे तुम्हाला जास्त थकवा येऊ शकतो, जो तुम्ही कदाचित गृहीत धरला नसावा. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट नसलात, तर ती सोडून द्या.

LUCKY SIGN - A rose quartz

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

विनाकारण घेतलेला ताण आणि गोंधळ यांमुळे उशीर होऊ शकतो. जे काही नियोजन असेल, त्यापेक्षा तुम्ही नेहमीच जास्त काम करता. आताचा काळ कोणाबद्दल किंवा कशाबद्दल थेट निष्कर्ष काढण्याचा नाही. वस्तुस्थिती तपासा.

LUCKY SIGN - Topaz

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

नशिबाची साथ मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या इच्छापूर्तीच्या दिशेचं हे पहिलं पाऊल असू शकेल. तुमचा सगळा संवाद साधा-सोपा आणि थेट मुद्द्याचा ठेवा. थोडी रिस्क असली, तरी मागे-पुढे पाहू नका.

LUCKY SIGN - A pyrite crystal

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास आणि खात्री वाटेल, अशा वातावरणाचे संकेत आहेत. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील आणि एखादा उपयुक्त सल्ला देईल. कुटुंबातल्या मुलांना सुट्टीसाठी कुठे तरी जाण्याची उत्सुकता असेल. येत्या काही दिवसांत त्याचं नियोजन होऊ शकेल.

LUCKY SIGN - A blue crystal

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही स्वतःला धाडसी समजू शकता आणि चाचणीच्या परिस्थितीत तुम्हाला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. कुटुंबाला तुमच्या मोठ्या आधाराची गरज भासू शकेल. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या एकामागून एक सोडवल्या जातील.

LUCKY SIGN - Clear quartz

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्या रूटीनमध्ये जे बदल असावेत असा विचार तुम्ही केला असेल त्यांचा समावेश रूटीनमध्ये करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी आणखी एक पैलू वाढेल. शेजाऱ्यांच्या भांडणांपासून दूर राहणं श्रेयस्कर.

LUCKY SIGN - An emerald

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमचं पद आणि अधिकार यांचा कोणी तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करील. तुम्ही दक्ष राहायला हवं आणि संवाद नेमका, वस्तुनिष्ठ असायला हवा. छोटा किंवा मोठा बदल घडवण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात.

LUCKY SIGN - A malachite

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

काही वेळा आपल्याला अगदी सामान्य गोष्टीमध्ये काही तरी असामान्य सापडतं. एखाद्या नामवंत संस्थेकडून तुम्हाला कामासाठी चांगला लीड मिळू शकेल. दुसऱ्या एखाद्या स्रोतातून उत्पन्न मिळवण्याची संधी तुमच्या मनात येऊन जाईल.

LUCKY SIGN - An amethyst

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

स्वतःला सर्वोत्तम पद्धतीने सादर करा आणि दिवसाचे प्राधान्यक्रम निश्चित ठेवा. दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या कामांकडे लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या जोडीदाराच्या शोधात असलात, तर तसा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यापाराचे चांगले रिझल्ट्स मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A sea shell

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

जीवनाच्या डायनॅमिक्समध्ये बदल होत आहेत. जुने पॅटर्न्स मोडले आहेत आणि नवे तयार होत आहेत. घडामोडींच्या काळात तुम्ही पाय घट्ट रोवून उभं राहण्याची गरज आहे. काही काळ अन्य कोणाला कर्ज देणं टाळा.

LUCKY SIGN - Jade plant

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

कठीण परिस्थिती किंवा कठीण ठिकाणी जाण्याचा रस्ता तुम्ही तयार करण्याची शक्यता आहे. सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीमुळे तुम्हाला थोडंसं दमल्यासारखं आणि वैतागल्यासारखंही वाटण्याची शक्यता आहे. थोडी विश्रांती खूप गरजेची आहे.

LUCKY SIGN - A salt lamp

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

परदेशप्रवासाचे प्लॅन्स तुम्ही करत आहात. त्यासाठी आता चांगला काळ आहे. नामवंत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलात, तर आता शक्यता कमी आहे. तुमच्या गरजा सोप्या करा, जेणेकरून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्या पूर्ण करणं तुम्हाला शक्य होईल.

LUCKY SIGN - A marble table

First published:

Tags: Astrology and horoscope