Home /News /astrology /

Daily Horoscope : उद्या तुमच्या राशीत काय लिहून ठेवलं आहे? पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : उद्या तुमच्या राशीत काय लिहून ठेवलं आहे? पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope 19 May 2022 : 19 मे 2022 रोजीचं बाराही राशींचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवस बिझी असेल. तुमची ऊर्जा कामाच्या दिशेने वळवली जाईल. तुमची संध्याकाळ घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल; मात्र तो लवकरच नियंत्रणात येईल. LUCKY SIGN - An opal वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या व्यक्तीला कॉल करणं तुम्ही सतत पुढे ढकलत असलात तर तो कॉल करण्याचा दिवस आहे. आता नियमित शारीरिक व्यायामाची गरज आहे. एखादं बिझनेस प्रपोझल तुमच्यासमोर येईल. ते फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN - A yellow sapphire मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) ऊर्जा तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. नावीन्यपूर्ण प्लॅन्स तयार केले जातील आणि ते तातडीने पूर्णत्वाच्या दिशेने जातील. त्यात प्रगतीसाठी तुमच्याकडे मंजुरीही असेल. LUCKY SIGN - A black tourmaline कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या आयुष्यात आलेला नवा मित्र हा केवळ थोड्या काळापुरता एक टप्पा आहे. त्याकडे फारसं गांभीर्याने पाहू नका. घरगुती मुद्द्यांकडे तातडीने लक्ष द्यावं लागेल. कोणा बाहेरच्या व्यक्तीकडून झालेल्या हस्तक्षेपामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास होईल. LUCKY SIGN - A lampshade सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्याभोवती तुमच्यासाठीचं काय आहे आणि इतरांसाठी काय आहे याचं सुलभीकरण करा. नवं रूटीन अंगीकारण्याचा प्रयत्न करत असलात तर ताणाचे काही क्षण येऊ शकतात. तुमच्या बॉसेसकडून तुमची पाठराखण केली जाऊ शकते. LUCKY SIGN - A labeled box कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या प्रिय व्यक्तींकडे तुमच्याकडून अधिक लक्ष दिलं जाण्याची गरज आहे. काही गैरसमज असल्यास ते दूर करावेत. क्रिएटिव्ह राहण्यासाठी आणि प्रगतीसाठी तुमच्या मनाला ताजंतवानं करण्याची गरज आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा काही वेळ बाहेर काढता येईल असं पाहा. LUCKY SIGN - A garden तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कामाच्या ठिकाणच्या काही गंभीर मुद्द्यांकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही पुरेशी झोप घेत आहात याची काळजी घ्या. दिवसभरात पुरेशी विश्रांती घ्या. संध्याकाळी एखादा मित्र भेटायला येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A squirrel वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) आगामी कौटुंबिक सोहळ्यासाठी तुम्ही उत्तमपणे केलेल्या तयारीला दाद मिळेल. दिवसातल्या तुमच्या प्रायॉरिटीज योग्य रितीने ठरवा आणि वेळ वाचवा. नवं रूटीन फॉलो करून तुम्ही चांगलं काम करत आहात. LUCKY SIGN - A parrot धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही अस्वस्थ होण्याची अनेक कारणं आहेत; पण लवकरच तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्यामध्ये नवा उत्साह निर्माण होण्याचे संकेत आहेत. तुमच्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीय तुमच्याशी सल्लामसलत न करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A red dress मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आता अधिक प्रॅक्टिस केली तर तुमचा नंतरचा वेळ वाचू शकेल. नवं एखादं कौशल्य आत्मसात करावं. तुमचं कौतुक करणारी व्यक्ती जवळच असेल. तुमच्या पदावर अनेक जणांचा डोळा आहे. LUCKY SIGN - A blue sapphire कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रगतीत होत असलेल्या उशिरासाठी काही अज्ञात घटक कारणीभूत आहेत. खूप खोलवर शोध घेतल्यानंतर मिळणारे निष्कर्ष तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. एखादा वस्तुनिष्ठ निर्णय तुम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी मदत करील. LUCKY SIGN - A green aventurine मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्हाला स्वतःला व्यक्त होण्यासाठी दिवस चांगला आहे. काही तरी लिहून काढा आणि ती लवकरच तुमची सवय बनेल. गेल्या वर्षी तुम्ही केलेल्या अचीव्हमेंट्सबद्दल कृतज्ञ राहा. दिवस नवी संधी घेऊन येईल. LUCKY SIGN - An emerald
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या