मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: वृषभ राशीला मिळेल नवी दिशा; कसा असेल तुमचा 18 जुलैचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: वृषभ राशीला मिळेल नवी दिशा; कसा असेल तुमचा 18 जुलैचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्पष्ट चिन्हं तुमच्या लक्षात येतील. पावसाळी दिवसांसाठी सर्व जय्यत तयारी ठेवा. आगामी काळातील मुलाखतीबाबत (इंटरव्ह्यू) नर्व्हस असाल, तर काळजीचं काही कारण नाही. सर्व गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल घडतील.

LUCKY SIGN from above – Stationery

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

एखादं स्वप्नं तुमचा दिवसभर पाठलाग करत राहील. एखाद्या नव्या दिशेनं केलेले थोडेसे प्रयत्नही फायदेशीर ठरतील. नोकरीच्या संदर्भात तुमचे नातेवाईक तुमचा सल्ला मागू शकतील.

LUCKY SIGN from above – A silk scarf

मिथुन ( मे 21 ते जून 21 )

जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही घाई गडबडीत तयारी केली असेल, तर ते पुरेसे ठरणार नाही. शेवटच्या मिनिटांतील अस्वस्थता व्यत्यय आणणारी ठरू शकते.एका वेळेस एकच गोष्ट करणे हिताचे आहे, असा सल्ला दिला जात आहे. थोडी ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

LUCKYSIGN from above – A large mirror

कर्क (जून 22 ते जुलै 22)

काही लोकांचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी तीव्र इच्छा तुम्हाला होऊ शकते. तुमच्या डोक्यातील विचारांचा गुंता कमी करण्यासाठी एक लाँग वॉक घ्या, फिरायला जा. भविष्यकाळातील नियोजन करणं फायद्याचं ठरेल.

LUCKY SIGN from above – a copper vessel

सिंह (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

येत्या काही काळात अचानक तुमचं एखादं स्वप्नं किंवा तुमचा ध्यास बनलेल्या एखाद्या गोष्टीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा दिवस लकी आहे. कदाचित तुमचं काम तिथं होण्याची शक्यता आहे. खूप जास्त लोकांबरोबर संवाद साधण्याचं टाळा, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो.

LUCKY SIGN from above – A red coral

कन्या (ऑगस्ट 23 ते सप्टेंबर 22)

भूतकाळात तुम्हीच तुम्हाला एखादं प्रॉमिस दिलं असेल. आता तेच वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. एखाद्या जुन्याच पॅटर्नची आता पुनरावृत्ती होऊ शकेल. तुमच्या भावडांना काही कौटुंबिक समस्या भेडसावतील.

LUCKY SIGN from above – A souvenir

तूळ (सप्टेंबर 23 ते ऑक्टोबर 22)

तुमची दैनंदिनं कामं वेळेत पूर्ण न करता आल्यानं कदाचित तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे तुमची ही कामं एखादेवेळेस थांबवणं कदाचित तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी इतरांबरोबर चांगला संवाद साधण्याचं नियोजन होईल याची खात्री करून घ्या.

LUCKY SIGN from above – A ceramic bowl

वृश्चिक ( ऑक्टोबर 24 ते नोव्हेंबर 21)

आज अगदी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाल्याचाही हा परिणाम असू शकेल. दिवसाच्या शेवटी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कदाचित काही स्पर्धा जाणवेल.

LUCKYSIGN from above – A terracotta basin

धनू (22 नोव्हेंबर – डिसेंबर 21)

एखादी गोष्ट करायची की नाही याबद्दलचं गूढ संपू शकेल. तुम्ही पुढे जाऊन ते काम पूर्ण करण्याचा पर्याय निवडाल. तुमच्या विचारांमध्ये गोंधळ नसणं महत्त्वाचं आहे. तुमची साममाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही त्या दिशेने काम कराल.

LUCKY SIGN from above – A monument

मकर (डिसेंबर 22- जानेवारी 19)

जर तुमच्या भावंडांचा तुमच्याशी वादविवाद झाला असेल तर तुम्ही त्यांना तुमचं काही मत सांगणं काहीकाळासाठी तरी थांबवा. एखाद्याशी खूप काळानं होणारं बोलणं, संवादयासारख्या छोट्याछोट्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळवून देतील. मित्रांची निवड करताना तुम्ही खूप विचार कराल.

LUCKY SIGN from above – A riddle

कुंभ (जानेवारी 20 ते फेब्रुवारी 18)

तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये तुमची कामं पूर्ण करण्यातही एक लय असेल. एखाद्या बातमीमुळे तुम्ही विचारात पडाल. एखादा नवीन खेळ तुमचं लक्ष वेधून घेईल. दिवस आनंदात जाणार आहे.

LUCKY SIGN from above – A desert of choice

मीन (फेब्रुवारी 19 ते मार्च 20)

काम आणि दैनंदिन आयुष्य यांच्यात मेळ घालण्याचा तुमचा प्रयत्न आता यशस्वी होताना दिसत आहे. टीममधील एखादी ज्येष्ठ व्यक्ती समजुतदारपणा दाखवेल. भूतकाळातील काही अनुभवांमुळे कुणावर विश्वास ठेवायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न बनेल.

LUCKYSIGN from above – A new car

First published:

Tags: Astrology and horoscope