Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी यशामुळे हुरळून जाऊ नका; जवळच्या व्यक्तीकडूनच आहे धोका

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी यशामुळे हुरळून जाऊ नका; जवळच्या व्यक्तीकडूनच आहे धोका

Daily Horoscope 18 June 2022 : तुमच्या राशीनुसार 18 जून 2022 चं तुमचं राशिभविष्य काय आहे पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्यासमोर अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रतिसाद देताना तुम्हाला नशीबवान असल्यासारखं वाटेल. कोणतीही मीटिंग किंवा असाइनमेंटपूर्वी पुरेसं होमवर्क केलं असल्याची खात्री करा. अपडेट राहण्यासाठी ते महत्त्वाचं असेल. LUCKY SIGN - A garnet stone वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आतून वाटणाऱ्या काही गोष्टींमुळे तुम्हाला पूर्वीच्या निर्णयांचा फेरविचार करावासा वाटेल. तुमचं मूल तुमचा वेळ घेईल मात्र ते उपयुक्त ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने पुढे टाकलेलं पाऊल भविष्यात उपयुक्त ठरेल. LUCKY SIGN - A blue tourmaline मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या कंपनी मॅनेजमेंटने घेतलेल्या एखाद्या धाडसी निर्णयाचा तुमच्यावरही परिणाम होईल. तुमच्या बाजूने संवाद निर्बंध घातल्याप्रमाणे होत असल्यासारखं तुम्हाला वाटेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे उत्साह वाढण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A star shaped crystal कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला नुकत्याच मिळालेल्या यशामुळे तुम्हाला आपण सर्वोत्तम आहोत असं वाटू लागलं असेल तर तुमच्या जवळची कोणी तरी व्यक्ती तुम्हाला कमी दाखवण्याची तयारी करत असेल. त्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला चांगलं धोरण ठरवण्याची गरज आहे. घरच्या आघाडीवर एखादी समाधानकारक बातमी मिळेल. LUCKY SIGN - A clear quartz crystal सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) स्वतःला शिस्तबद्ध होण्यासाठी काही वेळ काढण्यासाठी दिवस चांगला आहे. एकंदर ऊर्जेचे संकेत तसेच आहेत. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या गोष्टीची थेरपी म्हणून निवड करू शकता. उदा. जेवण तयार करणं, संगीत ऐकणं किंवा लाँग वॉक, इत्यादी. LUCKY SIGN - A flute कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) काही सकारात्मक बदल स्वीकारण्याच्या आणि त्यांचं स्वागत करण्याच्या मनःस्थितीत आणि तयारीत तुम्ही राहिलं पाहिजे. तुमच्या कामाच्या ठिकाणी समाविष्ट करण्यासाठी काही नव्या कल्पना तुम्हाला गवसतील. एखादी प्रभावी व्यक्ती काही कामासाठी तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A yellow crystal तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्हाला कोणाला तरी खरोखरच मदत करण्याची इच्छा असेल; मात्र तुमच्या भिडस्त स्वभावामुळे ते प्रत्यक्षात येणार नाही. वर्क अव्हेन्यू आता तुमच्या अपेक्षांपलीकडे असेल. प्रवासाचा एखादा छोटा प्लॅन तुम्हाला प्रेरणा देईल. LUCKY SIGN - A mountain वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला तुमच्या विचाराबद्दल पुन्हा विचार करावासा वाटणार नाही. तुमच्या कामाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. दिवस संपताना काही अनाहूत पाहुणे येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A cold brew धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला ज्या प्रकारचं कोलॅबोरेशन करायचं आहे त्या प्रकारची कल्पना घेऊन काही नव्या ओळखीच्या व्यक्ती पुढे येतील. एखाद्या जवळच्या मित्राला आता कदाचित भावनिक पाठिंब्याची गरज असावी. स्वतःची काळजी घेण्यात मग्न राहाल. LUCKY SIGN - A new petal मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) पुढे येणार असलेल्या एखाद्या बदलाचे संकेत देणारी परिस्थिती येईल. अनेक गोष्टी जशा होत्या तशा राहणार नाहीत. अचानक फिरायला जाण्याचा एखादा प्लॅन ठरवाल. त्यातून मनोरंजन होईल. LUCKY SIGN - A rose quartz कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या जीवनात काही प्रमाणात स्थैर्य येत आहे. त्यातून तुम्हाला चांगले विनोदही सुचतील. काही वेळा तुम्हाला आळसावल्यासारखं वाटेल. पण ती तात्पुरती स्थिती असेल. एखादा जुना मित्र पुन्हा भेटून नव्याने मैत्री करण्याचा प्रयत्न करील. LUCKY SIGN - Sparkling water मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एका मोठ्या जबाबदारीतून तुम्ही लवकरच मोकळे व्हाल. काही वेळा तुम्हाला सगळं सोडून द्यावंसं वाटेल पण तसं करू नका. काही गोष्टी पडद्यामागे घडत आहेत. त्या लवकरच समोर येतील. LUCKY SIGN - A neon sign
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या