Home /News /astrology /

Daily Horoscope : ऑफिसमध्ये सांभाळूनच राहा; करावा लागू शकतो 'या' आव्हानाचा सामना

Daily Horoscope : ऑफिसमध्ये सांभाळूनच राहा; करावा लागू शकतो 'या' आव्हानाचा सामना

Daily horoscope 17 May 2022 : ऑफिसमध्ये तुमचा आजचा दिवस म्हणावा तसा चांगला नाही. तुमच्या राशीत काय आहे पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवस तुम्हाला स्वतःला शक्ती देण्याचा आणि नव्या गोष्टीबद्दल प्रयोग करण्याचा आहे. काही घटकांवर तुम्हाला तातडीने लक्ष केंद्रित करावं लागेल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासू शकेल. LUCKY SIGN - A solitaire वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही भूतकाळात कधी तरी कल्पना केलेला क्षण जगण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अजून काही निकष पूर्ण होण्याची गरज आहे. लग्न जमण्याबद्दलचं सरप्राइज कुटुंबात अनुभवास येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Two feathers मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या गोष्टीला वेळ लागला याचा अर्थ असा नव्हे की ती गोष्ट घडणारच नाही. तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि संयम राखला पाहिजे. कामाच्या ठिकाणी टीका होऊ शकेल. प्रवासाचा बेत आखत असलात तर त्यात उशीर होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A wooden box कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला टाइमलाइन्सची आठवण करून देतील. तुम्हाला तुमच्या कामाचा वेग वाढवावा लागण्याची शक्यता आहे. नव्या संधीमुळे कामात नवा उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - White slab सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही एखादी गोष्ट धरू बसला असलात तर ती सोडून देण्याचा काळ आहे. तुम्ही रागाचं प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणावर करत असलात तर तुमची मनःशांती हरवून बसेल. फ्रेंडली वागण्यामुळे दिवस चांगला जाऊ शकेल. LUCKY SIGN - A jade plant कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही मिळवलेल्या गोष्टींबद्दल सेलिब्रेशन्स होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्लॅन्सची अंमलबजावणी आता होत आहे. जे निर्णय तुम्ही घेऊ शकला असतात त्यावर विचार करून व्यक्त होण्यासाठी थोडा वेळ काढा. LUCKY SIGN - A sticker तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखाद्या गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होत असलं तर ते तुम्ही तसं होऊ देत असल्यामुळे आहे हे लक्षात घ्या. तुमच्या जोडीदाराकडे असलेल्या कल्पनेतून तुमचा उत्पन्नाचा नवा स्रोत तयार होऊ शकतो. तुम्ही ट्रिपचं नियोजन करत असलात तर तो बेत सध्या तरी फसण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Sunshine वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही नशीबवान ठराल. तुम्ही स्वतः ठरवून घेतली सारी कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्येही तुम्हाला अनुकूल अशी चांगली हालचाल होईल. एखादा अवघड संवाद होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Yellow candles धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही एखाद्या विचारापासून दूर पळत असलात तर तो लवकरच तुमच्यामागे येऊन तुमची पाठ धरण्याची शक्यता आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी तुम्हाला धैर्याची उणीव जाणवेल. दिवस हेक्टिक असेल आणि तुमचं काम लवकर आटपण्यात तुम्ही कदाचित यशस्वी ठरणार नाही. LUCKY SIGN - A silicon mould मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) सरप्राइज वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतं. त्यापैकी एखादं तुम्हाला कदाचित आवडणार नाही. तुमच्या अ‍ॅटिट्यूडमुळे कोणी तरी दुखावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागण्याची शक्यता आहे. एखादी किरकोळ चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगावी. LUCKY SIGN - A crystal tumbler कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) परीक्षेचे रिझल्ट्स कदाचित अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत. टॅक्ट आणि डिप्लोमसी यांचा वापर करून तुम्हाला काम करून घेता येईल. दिवस दमवणारा असेल पण चांगल्या नोटवर संपेल. बेदरकारपणे ड्रायव्हिंग टाळा. LUCKY SIGN - An umbrella मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या आजूबाजूच्या कोणाकडून तरी तुम्हाला प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. काहीही न बोलता अंतर्मुख राहणं फायद्याचं ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी कोणी तरी तुमच्यावर आरोप करू शकेल. दिवस थोडासा रफ असू शकेल. LUCKY SIGN - A blue sky
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या