मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : सांभाळून राहा! तुमची जवळची व्यक्तीच तुमचा विश्वासघात करणार

Daily Horoscope : सांभाळून राहा! तुमची जवळची व्यक्तीच तुमचा विश्वासघात करणार

Daily Horoscope 17 July 2022 : 17 जुलै 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

Daily Horoscope 17 July 2022 : 17 जुलै 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

Daily Horoscope 17 July 2022 : 17 जुलै 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

जवळच्या मित्राकडून नवं काम किंवा व्यवसाय याबद्दल सल्ला मिळेल. सध्या लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असल्या तरीही ध्येयावर लक्ष ठेवून तुम्ही प्रयत्न केलेत तर यश निश्चितच मिळेल. तुमच्या परिसरातील तुमच्याबद्दल पूर्वग्रह असलेली काही मंडळी त्रास देऊ शकतात. छोटीशी सहल तुम्हाला आनंद देईल, बाहेरगावी गेलात तर आणखीनच उत्तम.

LUCKY SIGN – A Butterfly

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्ही उच्च शिक्षणासाठी करत असलेल्या प्रयत्नांत बहुधा अडचणी येत आहेत, हा काळ बहुतेक प्रगतीसाठी थोडा कठीण आहे. उच्च शिक्षणासाठी एखादी ग्रँट किंवा मदत निधी तुम्हाला मिळू शकतो. परगावी रहात असाल तर घरची आठवण येईल पण ती तात्पुरती असेल. आता सातत्याने व्यायाम करू शकाल. आई आजारपणामुळे चिडचिड करेल.

LUCKY SIGN – A Neon sign

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमच्या बिझनेस आयडियाला सुरुवातीला चांगलं यश मिळेल. तुम्ही जी झेप घेण्याचं नियोजन करत होतात ती घ्यायला आता हरकत नाही. व्यवसायातील भागीदारीमुळे आर्थिक चिंता कमी होतील आणि कष्ट करण्यासाठी बळ मिळेल. लग्नासाठी आलेला प्रस्ताव फळाला येऊ शकतो. तुमच्या विचारांत स्पष्टता येईल. मित्रांबरोबर फिरायला गेलात तर मन हलकं होईल.

LUCKY SIGN – A Salon

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमचं नातं जपण्यासाठी तुम्ही आधी केलेले थोडेसेच प्रयत्न आता कठीणकाळात नातं वाचवण्यासाठी प्रचंड मोलाचे ठरतील. भरपूर काम असलं तरीही ते करण्याजोगं असेल आणि एकावेळी अनेक कामं करत असाल तर थकून जाल. कोर्टासंबंधी काही काम करत असाल तर तुमचे पुरावे जपा. तुमच्या जवळचीच व्यक्ती समोरच्या पक्षाला गोपनीय माहिती देऊ शकते.

LUCKY SIGN – Antique article

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

उशिराने का होईना तुम्ही मान्य कराल की घाईने घेतलेले सगळेच निर्णय चुकत नसतात. कधीकधी प्रारब्ध आपल्याला विशिष्ट दिशेनं घेऊन जातं. तुमच्या निवडीबाबत तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आणि इतर जणही तुम्हाला सहमती दर्शवतील. ऑफिसमध्ये जरा गडबडी सुरू राहतील. मनातील विचार कायम तुमचं लक्ष भरकटवतातत्याकडे दुर्लक्ष करून नाकासमोर चाला.

LUCKY SIGN – A Silver Coin

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्या जवळचा मित्र किंवा भावंड तुमच्या कौशल्याचा उत्तम वापर करून घेतील. सध्याचा निवांत दिनक्रम लवकरच घाईगडबडीचा होणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी शोधत आहात त्याकडे तुमच्या जवळच्याच कुणाचं तरी लक्ष आहे ती व्यक्ती कदाचित तशी संधी देईल. स्वयंजागृतीतून स्वभावात एक छोटा बदल करू शकता अर्थात तो हितावहच असेल.

LUCKY SIGN – A

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्या भूतकाळातील अनुभवांवरून तुम्ही भविष्यातील दृष्टिकोन ठरवाल आणि आधी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न कराल. काही महत्त्वाच्या बाबींबद्दल तुम्हाला स्पष्टता येत नसेल तर तुम्ही कुणाचातरी सल्ला घ्या. एखाद्या आर्थिक फायद्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी रूळावर येतील. सहलीला जायचं ठरत असेल तर जाऊन या. तुम्ही स्वत:कडे खूपच समीक्षणात्मक नजरेतनं पाहताय असं तुम्हालाच जाणवेल.

LUCKY SIGN – A blue car

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

सोबतच्या सहकाऱ्यांवर दबाव तंत्र आता चालणार नाही. तुम्ही जवळच्या काही जणांकडे दुर्लक्ष करत आहात आणि तुमचा हेतूही स्वच्छ आहे पण आता संवादाची पद्धत बदलावी लागेल. तुम्ही अधिकारपदावर असाल तर तुम्हाला तशीच प्रतिमा निर्माण करावी लागेल. धंदा मार्गावर येईल. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांचा एखादा चांगला फायद्याचा सौदा होईल.

LUCKY SIGN – Your favorite sweet

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्या डोक्यात दिशाहीन विचारांचा गोंधळ सुरू आहे. तुमच्या उद्योगातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला फायद्याचा ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही जोडीदाराला वेळ द्यायला हवा, तुमच्याबद्दल त्याच्या मनात असलेल्या पूर्वग्रहांचं निराकरण करायला हवं. तुम्ही जर तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं नाहीत तर भांडणं होऊ शकतात.

LUCKY SIGN – An indore plant

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा किंवा संधी मिळवण्याचा विचार करत असाल तर आता प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची गरज आहे. तुमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काही पर्याय तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी अस्वस्थता आता निघून जाईल आणि तुम्हाला आत्मविश्वास आणि आनंदी वाटेल. जोडीदार पटेल असा सल्ला देईल.

LUCKY SIGN – A Candle stand

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

इतरांच्या वर्चस्वाखाली काम करणारे आता स्वत: चं काही करण्याचा आणि हाताखाली माणसं ठेवण्याचा विचार करतील. कधीकधी तुमच्या व्यक्त होण्यातून तुमच्या मनातलं समोरच्याला कळत नाही त्यामुळे स्पष्टपणे बोला. नव्या नोकरीच्या संधी आता मिळू लागतील. नात्यांमध्येही सुधारणा होताना तुम्हाला जाणवेल. जुनी भीती लवकरच मनातून जाईल.

LUCKY SIGN – A yellow stone

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

दैवी उर्जेचा तुम्हाला पाठिंबा नसेल त्यामुळे तुम्ही मनात जे ठरवाल आणि जी कृती कराल यात तफावत राहील. एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला नव्या युक्ती शोधायला हव्यात. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी सांभाळून बोलावं जेणेकरून तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाणार नाही. एखादं नवं कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते नीट शिकलात तर त्यातूनच एखादा व्यवसाय करण्याची युक्ती सुचेल.

LUCKY SIGN – A cup holder

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs