सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आज चांगल्या बातम्या मिळतील. विशेषत: आर्थिक बाबतीतल्या चांगल्या बातम्या मिळण्याची अधिक शक्यता आहे. तुमच्याबाबत घडणाऱ्या अनेक चांगल्या घटनांमुळे तुम्ही भारावून जाल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कायदेशीर वादात अडकू शकते.
LUCKY SIGN - पतंग (A kite)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुमच्या आयुष्यात आलेली एखादी नवीन व्यक्ती तुमचं लक्ष विचलित करू शकते. एखादं संकट किंवा वादाचा परिणाम तुमच्यावर होणार असल्याची भावना निर्माण होईल. जी गोष्ट तुम्ही शंभर टक्के करू शकाल याची खात्री नाही त्याबाबत कोणालाही शब्द देऊ नका.
LUCKY SIGN - पवनचक्की (a windmill)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
अथक मेहनतीनं नुकत्याच पूर्ण केलेल्या असाइनमेंटमुळे थकवा जाणवेल. आयुष्यात पुढं तुम्हाला काय करायचं आहे, हे ठरवण्यासाठी आता वेळ द्यावा लागेल. एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते, ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल.
LUCKY SIGN - चांदीची तार (a silver wire)
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
स्वतःसाठी काही खरेदी करण्याची योजना आखली असेल, तर तुमचा त्यात भरपूर वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी काही काम वेळेत संपवण्याची तातडी असेल. घरकामाला येणाऱ्या लोकांच्या गैरहजेरीमुळे तुमच्या रोजच्या कामात अडथळे येतील.
LUCKY SIGN - चांदीची भांडी (silverware)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही पूर्वी नाकारलेला एखादा पर्याय पुन्हा उपलब्ध होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची अतिचिकित्सा केल्यानं गोंधळच निर्माण होऊ शकतो. आजच्या दिवसात कामकाजात काही तांत्रिक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे बॅकअप घ्यायला विसरू नका.
LUCKY SIGN - लाकडी काठी (a wooden stick)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
आव्हानांचा सामना करताना अचानक तुम्हाला कोणाचेतरी मजबूत पाठबळ मिळेल. एखाद्या व्यक्तीची अचानक झालेली भेट सकारात्मक ठरेल. एखाद्या गोष्टीत खूप घाईघाई केल्यासारखं वाटेल. त्यामुळे सगळं स्थिरस्थावर होण्यास वेळ द्या.
LUCKY SIGN - मातीचं भांडं (A clay jar)
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखादं गेट-टुगेदर घडण्याची शक्यता आहे, त्यात छान गप्पा होतील. मन प्रसन्न होईल. तुमचं कौतुक करणारी एखादी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. एखाद्या मोठ्या वॉकवेळी स्वत:शी संवाद साधता येईल. मनात नेमकं काय चाललंय त्याबद्दल शांत चित्ताने विचार करता येईल.
LUCKY SIGN - सोन्याचं जाळं (A gold net)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुम्हाला अधिक अधिकार प्राप्त होतील. मुबलक पैसा सहजपणे मिळण्याची संधी उपलब्ध होईल. एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल तर ती गोष्ट लवकरच तुम्हाला मिळेल. कुटुंबातील व्यक्तीशी भांडण टाळा.
LUCKY SIGN -ट्रंक (storage trunk)
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्हाला दिलेलं एखादं काम पुढं ढकललं जाऊ शकतं किंवा तुम्हाला त्यासाठी अगदी कमी वेळ मिळू शकतो. त्यामुळे तयारीत असणं उत्तम. तुमच्या वडिलांनी तुम्हाला एखादं काम दिलं असेल तर ते वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही सज्ज असणं महत्त्वाचं आहे.
LUCKY SIGN - बबल रॅप (a bubble wrap)
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
कोणताही छोटा, मोठा प्रवास मनाला प्रसन्नता, शांतता देईल. या आठवड्यात जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. मनात अनेक विचारांची गर्दी होत असेल तरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि एक काहीतरी ठोस योजना आखा.
LUCKY SIGN - पेपर कप (a paper cup)
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखाद्या नवीन व्यक्तीकडून तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. काही नातेसंबंधांत अडचणी जाणवत असतील तर त्या आता दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्याचं नुकसान दुसऱ्याला फायदाही करून देऊ शकतं.
LUCKY SIGN - पीच गुलाब (peach roses)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
प्रकृतीच्या त्रासामुळे मन अस्वस्थ होईल. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्याला घरगुती समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय लवकरच सुरू होणार आहे. मात्र तुम्ही गृहीत धरल्यापेक्षा वास्तव वेगळं असेल.
LUCKY SIGN -पिवळं कापड (a yellow cloth)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.