मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: अतिरिक्त काम आणि प्रचंड ताण तणावाचा आजचा दिवस; नव्या आव्हानासाठी तयार राहा

Daily Horoscope: अतिरिक्त काम आणि प्रचंड ताण तणावाचा आजचा दिवस; नव्या आव्हानासाठी तयार राहा

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) अलीकडेच शिकलेली कौशल्यं आता उपयोगी पडतील. अतिरिक्त कामामुळे तुम्हाला काहीसा ताण जाणवेल. नव्या आव्हानासाठी तयार राहा. LUCKY SIGN - A feather वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते. जुन्या मित्राशी पुन्हा जोडलं जाणं दिलासा देणारं ठरू शकतं. अचानक काही विचार न करता ठरवलेला प्रवासाचा बेत ही चांगली कल्पना ठरणार नाही. LUCKY SIGN - A bird मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. नावीन्यपूर्ण कल्पनांमधून तातडीने काही तरी प्राप्त होईल. काही तरी 'आउट ऑफ द बॉक्स' गोष्ट करण्यासाठीही तुम्हाला परवानगी मिळेल. LUCKY SIGN - A spider कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला आता सत्य स्पष्टपणे दिसत आहे. ते स्वीकारून जगायला शिका. तुम्हाला त्याबद्दल पुढे चर्चा करायला संकोच वाटू शकेल. परिस्थिती कितीही वाईट असली, तरीही एखाद्याला दुसरी संधी द्यायला हवी. LUCKY SIGN - Two sparrows सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) योगायोग वगैरे असं काही नसतं. एखादी गोष्ट तुमच्यासमोर आली असेल, तर ती तुमच्यासाठीच आहे. थोड्याफार अडचणी येतील; पण सारं काही व्यवस्थित होईल. सारी चिन्हं सकारात्मक आहेत. LUCKY SIGN - A ceramic vase कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्यासाठी योग्य त्या गोष्टीची निवड करण्यासाठी तुम्ही सध्या उत्तम मानसिक स्थितीत नाही आहात. याचाच अर्थ असा, की तुम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. एखादा निर्णय घेण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे. LUCKY SIGN - Blue pottery तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कामाच्या ठिकाणी काही नव्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविषयी काही मत बनवण्याआधी त्यांना समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या. घरात खूपच कमी वेळ असल्यामुळे तुम्हाला थोडं त्रासदायक वाटू शकेल. LUCKY SIGN - An eagle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) उत्साहवर्धक वातावरणात सुंदरशा जेवणाचा आस्वाद घेऊन तुम्हाला आता बराच काळ झाला आहे. सध्या एकामागून एक खूप कामाचे दिवस येत आहेत. आधी केलेल्या काही गुंतवणुकीमध्ये आता हालचाल दिसू लागेल. LUCKY SIGN - A squirrel धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) शेवटच्या संधीला एखादी रूपेरी किनार असण्याची शक्यता आहे. तुमची मुलं तुमच्याकडून वेळ आणि कमिटमेंटची मागणी आता आणखी करतील. घरातल्या वयोवृद्ध व्यक्ती आरोग्याची काही तक्रार करतील. LUCKY SIGN - A garden मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आता तुम्ही ठरवलंच असलंत, तर खेळी खेळली पाहिजे. वेळ हा महत्त्वाचा पैलू आहे. उशीर होता कामा नये. तुमचा जोडीदार हा तुमचा एखाद्या खडकासारखा मजबूत साथीदार आहे. दिवसाच्या उत्तरार्धात काही पाहुणे येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A parrot कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) मोठं ओझं उतरल्यामुळे आता तुम्हाला खूप हलकं वाटेल. कामात आणखी चालढकल करू नका. शिस्तबद्ध राहा. कोणाला तरी तुमची उणीव खूप जाणवत आहे. LUCKY SIGN - A nest मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) आज साऱ्याचा वेग तात्पुरत्या स्वरूपात मंदावण्याची शक्यता आहे. पुढचे निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता, याबद्दल स्पष्ट विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ विसंवादाचं कारण ठरू शकतो. किरकोळ चोरीची शक्यता. सावध राहा. LUCKY SIGN - A turtle
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या