Home /News /astrology /

Daily Horoscope : तो किंवा ती सध्या काय करतेय? तुमच्या 'एक्स'बाबत मिळेल महत्त्वाची माहिती

Daily Horoscope : तो किंवा ती सध्या काय करतेय? तुमच्या 'एक्स'बाबत मिळेल महत्त्वाची माहिती

Daily Horoscope 16 June 2022 : 16 जून 2022 चा तुमचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखाद्या नवीन कामाबाबत वा कमिटमेंटबद्दल शंका वाटू शकेल; मात्र जे काही सुरू आहे ते अगदी योग्य दिशेने सुरू आहे हे लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीने काही गुपित तुमच्यासोबत शेअर केलं असेल, तर ते तुमच्यापर्यंतच ठेवा. दैनंदिन आयुष्यातून छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. LUCKY SIGN – A Glass tumbler वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) भूतकाळात झालेले काही गंभीर आरोप पुन्हा होतील. ज्या काही चर्चा होत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. LUCKY SIGN – A Turmeric product मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) रिलेशनशिपमधून भरपूर अपेक्षा ठेवू नका. त्याचा तुम्हालाच त्रास होईल. तुमच्या भल्यासाठी योग्य नसणाऱ्या गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण आहे. संध्याकाळी एखादी नवीन गोष्ट शिकाल, ज्याचं तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कोणताही हस्तक्षेप वादाचं मूळ कारण ठरेल. LUCKY SIGN – A Herb कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) रखडलेली घरगुती कामं पूर्ण करण्याचा दिवस आहे. एखादं ऑफसाइट काम तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची पत वाढेल. काही नवीन मित्रांमुळे आत्मविश्वास वाढेल. LUCKY SIGN – A Sand Paper सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला भावनिक प्रतिसाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुमची रखडलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. ओळखीची एखादी व्यक्ती नवा प्रस्ताव मांडेल त्यावर विचार करा. पोटाचे विकार जाणवतील. LUCKY SIGN – A Squirrel कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही भ्रमात अडकलात तर मूळ कामाला धक्का बसतो हे लक्षात घ्या. तुमच्या जुन्या सवयी सोडणं तेवढं सोपं नाही. त्यातच तुमचा अ‍ॅग्रेसिव्ह स्वभाव आणखी अडचणीचा ठरेल. एखादा जुना छंद पुन्हा सुरू कराल. LUCKY SIGN – A black crystal तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) बरेच दिवस गाठभेट नसलेल्या दूरच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी उत्तम दिवस. भूतकाळात काही वेळ रमून जाल. येत्या काळात भरपूर काम करावं लागणार आहे. तेव्हा आराम करून घ्या. LUCKY SIGN – A Dreamcatcher वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमची वैयक्तिक कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस. तुम्ही जे बदल करायचे ठरवाल त्यांचा दीर्घ काळ फायदा दिसेल. कामाच्या ठिकाणी नवीन पद्धत सुरू कराल. सुरुवातीला त्या पद्धतीवर काही प्रमाणात टीका-विरोध होईल. LUCKY SIGN – A Clear Sky धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) जुन्या नोंदी, फोटो किंवा एखाद्या जुन्या मित्राचा फोन कॉल यामध्ये रमून जाल. मानसिक थकवा जाणवेल. एकट्यानेच वॉकला जाणं मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN – A New Routine मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दिवस खरेदीमध्ये जाईल. बाहेर खाणं होऊ शकतं. कौटुंबिक कारणांसाठी छोटासा प्रवास करावा लागेल. काही प्रमाणात चढ-उतार असला तरी आर्थिक प्रवाह स्थिर राहिल. LUCKY SIGN – A Stepper कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आता जबाबादारीने सज्ज व्हायला हवं. काही भावनिक करणाऱ्या घटनांमुळे तुमची एनर्जी कमी राहील. मित्रांसोबत अचानक काही प्लॅन ठरू शकतात. LUCKY SIGN – A Coffee Mug मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) संकटाचा एखादा क्षण तुम्हाला तुमची कौशल्यं दाखवण्याची संधी देऊन जाईल. तुम्ही काय करता याकडे इतरांचंलक्ष असेल. तुमच्या एक्सबाबत महत्त्वाची माहिती मिळेल. LUCKY SIGN – A feather
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या