मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : प्रमोशन, नवी गाडी आणि बरंच काही...; 16 जुलैचं तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : प्रमोशन, नवी गाडी आणि बरंच काही...; 16 जुलैचं तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope 16 July 2022 : 16 जुलै रोजी तुमच्या राशीत काय आहे पाहा.

Daily Horoscope 16 July 2022 : 16 जुलै रोजी तुमच्या राशीत काय आहे पाहा.

Daily Horoscope 16 July 2022 : 16 जुलै रोजी तुमच्या राशीत काय आहे पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

काही वेळा गोष्टी सोडून देणं फार कठीण असतं. बिझनेसशी संबंधित एखादी नवी पार्टनरशिप तयार होऊ शकते. सध्या स्पर्धा टाळून केवळ हातात असलेल्या संधींवर लक्ष द्या.

LUCKY SIGN – A Lake

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्हाला कामाच्या ठिकाणी यापूर्वीही वॉर्निंग देण्यात आली आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा वरिष्ठ खपवून घेणार नाहीत. कामाशी संबंधित आव्हानांवर मात करण्याची तयारी सुरू करावी लागेल. प्रकृतीच्या समस्या जाणवतील.

LUCKY SIGN – A honey bee

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमच्या मनात काय आहे हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा. तुम्ही काय बोलता आहात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखादा सहकारी सर्वांसमोर तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करील.

LUCKY SIGN – A Bronze wallet

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही इतरांना सकारात्मक ऊर्जा देणारी व्यक्ती आहात याची जाणीव होईल. सत्य परिस्थिती स्वीकारण्याची तयारी तुम्ही करायला हवी. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता अशा व्यक्तींचं परीक्षण करणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN – A tumbler

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

टीम स्पिरिट, अनुकूल वृत्ती आणि शिकाऊ वृत्ती आत्मसात करण्याची गरज आहे. घरी तुमच्या वागणुकीमुळे तुमच्यावर टीका होत आहे. आर्थिक व्यवहार बारकाईने हाताळण्याची गरज आहे.

LUCKY SIGN – A Walking stick

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

काही वेळा दोन व्यक्तींच्या भेटीनंतर खरोखरच स्पार्क जाणवतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. अगदी अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीची भेट होईल. लवकरच एखादी छोटीशी सहल आयोजित होईल.

LUCKY SIGN – A Black Crystal

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

सध्या काही गोष्टींबद्दल तुम्हाला खात्री वाटत नसेल, तर त्या पुढे ढकलणंच उत्तम. आपल्या कुटुंबीयांसोबत थोडा क्वालिटी टाइम व्यतीत करा. एखादा नव्या प्रोजेक्ट किंवा कामामुळे पुढचे काही दिवस बिझी असाल.

LUCKY SIGN – Teak Wood furniture

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून रखडलेलं प्रमोशन आता तुम्हाला मिळेल. लवकरच एखादं गेट टुगेदर आयोजित होईल, ज्यामुळे तुम्हाला अगदी उत्साही वाटेल. भविष्यात खर्च करायचा असेल, तर आत्ता बचत करा.

LUCKY SIGN – A Bamboo Plant

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

रागाने कधीही कुठल्या गोष्टीचं समाधान मिळत नसतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जुगार किंवा तत्सम गोष्टींमध्ये पैसे उडवू नका. लवकरच नवीन गाडी घेऊ शकाल.

LUCKY SIGN – A Clear quartz

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची प्रकृती चिंतेचा विषय ठरू शकते. एखादं अचानक आलेलं संकट निवारण्यासाठी कोणाची तरी मदत वा कर्ज उपयोगी पडेल. काही काळ आर्थिक तंगी राहील. जोडीदारासोबत चर्चा केल्यास फायदा होईल.

LUCKY SIGN – A Climber

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्हाला जशी अपेक्षा होती, तशी वागणूक तुम्हाला मिळणार नाही. घराबाहेर काही क्वालिटी टाइम व्यतीत कराल. एखादी छोटीशी सहलदेखील होऊ शकते. यानंतर जेव्हा घरी परत याल, तेव्हा ताण मागेच ठेवून या.

LUCKY SIGN – Blue Sapphire

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

बऱ्याच काळापासून मागे ठेवलेली कामं पूर्ण करावी लागतील. एकदम भरपूर काम आल्यामुळे ताण जाणवेल. घरकामामध्ये भरपूर मदत मिळेल. एखादी गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ आहे.

LUCKY SIGN – A peacock’s feather

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs