Home /News /astrology /

Daily Horoscope : तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कसा असेल उद्याचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कसा असेल उद्याचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope 14 May 2022 : 14 मे 2022 या दिवशी तुमच्या राशीत काय आहे?

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) जास्त कामामुळे किंवा पूर्वीच्या कमिटमेंट्समुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. नियोजन केल्यास आणि थोडीशी मदत मिळाल्यास ही समस्या सुटू शकते. सेलिब्रेशनसाठी पूर्वतयारी करा. LUCKY SIGN - ब्लॅक टुर्मलिन (A Black Tourmaline) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखादी परिस्थिती उद्भवण्यापूर्वी काहीही अंदाज बांधू नका. मल्टिटास्किंगमुळे तुमच्या मनाची अस्वस्थता वाढू शकते. आपल्या आरोग्याची आणि रूटिनची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. LUCKY SIGN - विटांची भिंत (A Brick Wall) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) स्वत: शीच एखादी नवीन कमिटमेंट निश्चित करा आणि ती पूर्ण करण्यासाठी डेडलाईन सेट करा. तुमच्यातील एनर्जी काम साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देईल. बाहेरून मिळणारी एखादी पॉझिटिव्ह न्यूज किंवा संभाषण तुमचा मूड ठीक करू शकतं. LUCKY SIGN - ज्युट बॅग (A Jute Bag) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) दुपारपर्यंत वादविवादामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. तुमचं रिलेशनशीप स्ट्राँग होईल; पण त्यासाठी वेळ लागेल. एखाद्या अडकलेल्या प्रकरणासाठी तुम्ही एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचा सल्ला घेण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - गिफ्ट (A Gift) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. काही काळ तुमची कामं रेंगाळू शकतात. प्रलंबित असलेल्या काही कायदेशीर बाबींना आता गती मिळेल. LUCKY SIGN - डेकोरेटेड शॉप (A Decorated Shop) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामात अचानक झालेल्या प्रगतीमुळे आजचा दिवस सार्थकी लागल्याचं वाटेल. आपल्या पोटाची काळजी घ्या. कामाचा वेग कमी केल्यास तुम्हाला नंतर फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या गोष्टीचं आत्तापासून नियोजन सुरू करू शकता. LUCKY SIGN - लॅम्प (Lamp) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कुटुंब आणि मित्रांमध्ये तुमची इमेज आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलणं टाळत असाल तर ते पूर्ण करण्याची योग्य वेळ आली आहे. दिवसाचा शेवट तुम्हाला अधिक आरामदायी आणि स्थिर वाटेल. LUCKY SIGN - निरभ्र आकाश (A Clear Sky) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) काही ओळखीचे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील. तुम्ही आत्ममग्न राहाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी सोपवण्याची चर्चा होऊ शकते. एखादा फॅमिली फ्रेंड तुम्हाला मदत करू शकतो. LUCKY SIGN - अ ब्राईट अम्ब्रेला (a bright umbrella) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) जुने फोटो बघून विसरलेल्या आठवणींना उजाळा मिळण्याची शक्यता आहे. काही आर्थिक गोष्टी आशादायी वाटतील. थंड्या बस्त्यात पडलेले प्रश्न मनाच्या शांततेमुळे सोडवता येतील आणि कदाचित त्याच प्रश्नांसंदर्भात तुम्हाला काही सूचक संकेत मिळतील. LUCKY SIGN - कबुतराचा पंख (Pigeon Feather) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कॉम्प्लिकेडेट गोष्टींकडे साध्या-सरळ दृष्टिकोनातून बघा. ज्या गोष्टींच निराकरण होत नाही त्या पुन्हा पडताळून बघा. एखादं काम पुढे नेण्यासाठी दिवस एनर्जीनं पुरेपुर भरलेला आहे. मेडिटेशन केल्यास मदत होईल. LUCKY SIGN - कॉफी मग (Coffee Mug) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) मित्राची एखादी छोटीशी कृती तुमचा दिवस चांगला करण्यास पुरेशी ठरेल. खरेदी करण्याचा योग आहे. प्लेझंट वाईब्स मिळणार आहेत, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. घराबाहेर खाण्यावर मर्यादा घाला. अधिक व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - सिरॅमिक बाऊल (A Ceramic Bowl) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नवीन नातेसंबंध तयार होण्यास वेळ लागेल. त्यामुळे तुम्हाला धीर धरावा लागेल. नव्यानं संवाद सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्याबद्दल कमिटमेंट करणं टाळा. तुमचा आक्रमकपणा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - अँटिक क्लॉक (An Antique Clock)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या