Home /News /astrology /

Daily Horoscope : गुंतवणूकदारांसाठी अधिक महत्त्वाचं; जरूर वाचा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : गुंतवणूकदारांसाठी अधिक महत्त्वाचं; जरूर वाचा तुमचं राशिभविष्य

Daily horoscope 13 May 2022 : जन्मतारखेनुसार ठरते ती सूर्यरास आणि या राशीनुसार तुमचं 13 मे 2022 रोजीचं राशिभविष्य पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 13 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही भूतकाळात जे काही केलंय, त्याचे परिणाम कधी दिसणार हे वेळेवर अवलंबून आहे.  दिवस तुमची प्राधान्यक्रमाची, महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा आहे. ती कामं छोटी वाटतील पण ती सध्या निगडित आहेत. प्रवासाचा बेत कदाचित पुढे ढकलावा लागू शकेल. LUCKY SIGN - A diamond वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्याच्या नव्या ऊर्जेमुळे तुमचा मूडही पुनरुज्जीवित होईल आणि चांगलं वातावरण तयार होईल. तुम्हाला काही महिन्यांपूर्वी भेटलेली व्यक्ती कदाचित पुन्हा भेटेल आणि काही उपयोग होईल. तुमचं नेटवर्क चांगलं आहे. तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी त्या नेटवर्कचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - A wooden box मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखादी गोष्ट सुरू करतानाचं नशीब तुम्ही अनुभवू शकाल. त्यामुळे सुरुवात चांगली होईल. दुसऱ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्यास निराशा होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं असेल किंवा पैसे उसने घेतले असतील, तर तुमच्यावर कदाचित थोडं ऑकवर्ड वाटण्याचा प्रसंग ओढवू शकतो. LUCKY SIGN - A ruby कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही दुसऱ्या कोणाच्या कामात अडथळा आणला असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. तुमचा जवळचा मित्र काही गुप्त गोष्टी शेअर करण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांच्या गुप्ततेचा आदर केला पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Indoor plant सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दिवस मित्रांना समर्पित केलेला असेल आणि त्यांचा आनंद साजरा करण्याचा असेल. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असेल तर आता त्याचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. एखादी कोर्ट केस प्रलंबित असली तर त्यात एखादी सकारात्मक हालचाल दिसू शकेल. LUCKY SIGN - A cardboard कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) चांगल्या गोष्टी वेळ घेतात आणि आतापर्यंत तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर आता तुम्ही भूतकाळात केलेल्या गोष्टींचे लाभ घेण्याची वेळ आली आहे. जवळचा एखादा मित्र अडचणीत असेल आणि तुमच्याकडून एखाद्या चांगल्या सल्ल्याची अपेक्षा करील. LUCKY SIGN - A clear quartz तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) गोंधळाच्या बऱ्याच काळानंतर दिवस अधिक चांगला आणि शांततापूर्ण असेल. तुमच्याकडे काही पाहुणे राहायला येऊ शकतील. तुम्हाला त्यांचं आदरातिथ्य करायला मिळेल; मात्र त्यात तुमची दमछाकही होऊ शकेल. तुमच्या कामाबद्दलची एखादी चांगली बातमी तुम्हाला उत्साह देईल. LUCKY SIGN - Money plant वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुलनेने नवीन ओळख झालेल्या एखाद्या व्यक्तीसोबत तुमची केमिस्ट्री चांगली जुळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर सातत्यपूर्ण हास्य खुलेल. तुम्ही बऱ्याच काळापासून एखादी गोष्ट व्यक्त करण्याचा विचार करत आहात. आता तुम्हाला ते करण्याचं धैर्य मिळेल. LUCKY SIGN - A lamp धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) बऱ्याच काळानंतर तुम्हाला तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी परत मिळतील. तुम्ही ज्यात गुंतला आहात, त्या संशोधनातून तुम्हाला काही ठोस निष्कर्ष सापडतील. तुमचा शैक्षणिक प्रवास प्रगतिशील मार्गाने सुरू आहे. LUCKY SIGN - A rug मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) अलीकडेच तुमचं कौतुक झालं आहे. त्यातून तुम्हाला मिळालेली व्हायब्रंट ऊर्जा आज अनुभवता येईल. आगामी काळात तुमच्या कामाला संपूर्ण नवा अर्थ प्राप्त होईल. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वासाचा काही मुद्दा असेल. तुमचे पैसे शहाणपणाने खर्च करा. LUCKY SIGN - A milestone कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही जे काही करत होतात, तिकडे परत येण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या इच्छेला जोर लावावा लागेल. एखाद्या जवळच्या मित्राला ट्रिपसाठी तुमची कंपनी हवी असेल. आता तुम्हाला मागे राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मोठ्या गुंतवणुकीसाठी अधिक निधीची गरज भासू शकेल. LUCKY SIGN - A wooden plank मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) काही अडचणी येतील. त्यामुळे पैशांचा मुद्दा प्राधान्यक्रमावर येईल; पण हा मुद्दा तात्पुरता असेल. त्यामुळे थोड्या काळात प्रवाह पुन्हा सुरळीत होईल. चांगले कपडे घालून सोशली सक्रिय राहण्याची इच्छा होईल. मनोरंजनाच्या अनेक संधी चालून येत आहेत. LUCKY SIGN - A yellow crystal
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या