Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' कामासाठी उत्तम आहे उद्याचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : 'या' कामासाठी उत्तम आहे उद्याचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily horoscope 12 May 2022 : तुमच्या राशीनुसार तुम्ही 12 मे 2022 रोजी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आधी केलेल्या कमिटमेंट्समुळे आणि कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. नवीन काम हाती घेण्यासाठी शिस्तबद्ध पद्धत फायद्याची ठरेल. काही दिवसांमध्येच एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. LUCKY SIGN – A turquoise stone वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एकाच वेळी अनेक कामं हाती घेतल्यामुळे मानसिक तणाव वाढेल. एखादी परिस्थिती येण्यापूर्वीच त्याबद्दल गृहीतकं मनात ठेवू नका. तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. LUCKY SIGN –A ceramic bowl मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) स्वतःशी नव्या कमिटमेंट्स करा आणि त्यासाठी डेडलाइन ठरवा. या कमिटमेंट्स पार पाडण्यासाठी तुमच्याकडे भरपूर ऊर्जा असेल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे किंवा विदेशातल्या एखाद्या व्यक्तीशी बोलणं झाल्यामुळे मूड चांगला राहील. LUCKY SIGN - Monochrome Bag कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) दुपारनंतर काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूड खराब राहिल. तुमची रिलेशनशिप मजबूत होईल, मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल. रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्याल. LUCKY SIGN – A Gift सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा इतरांना संधी द्याल. रखडलेली कायदेशीर प्रकरणं मार्गी लागतील. LUCKY SIGN – A Decorated room कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामाच्या ठिकाणी झालेली एखादी गोष्ट तुमचा संपूर्ण दिवस आनंदी करेल. तब्येतीची, विशेषतः पचनाची काळजी घ्या. सध्या तुमचा वेग आवरता घेतल्यास त्याचा भविष्यात अधिक फायदा दिसेल. भविष्यासाठीचं प्लॅनिंग सुरू करू शकता. LUCKY SIGN – A new Lamp तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात तुमची प्रतिमा आणखी चांगली होईल. काही काळापासून तुम्ही एखादी बोलणी पुढे ढकलत असाल, तर ती पूर्ण करण्याची योग्य संधी आहे. दिवसाच्या शेवटी अगदी शांत आणि रिलॅक्स वाटेल. LUCKY SIGN – A Clear Sky वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) ओळखीतल्या काही व्यक्ती तुमच्याबद्दल गॉसिप करतील. स्वतःमध्येच गुंतून राहाल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे नवी जबाबदारी देण्याबाबत चर्चा होईल. एखाद्या फॅमिली फ्रेंडची भरपूर मदत होईल. LUCKY SIGN – An Amber stone धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) विस्मरणात गेलेल्या आठवणी जुने फोटो पाहून ताज्या होतील. काही आर्थिक बाबी आशादायी वाटतील. मन शांत असल्यामुळे रखडलेली कामं आरामात पार पडतील. कामासंबंधी एखादा मेसेज मिळेल. LUCKY SIGN – An Emerald मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) क्लिष्ट प्रश्नांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कित्येक वेळा अवघड प्रश्नांची उत्तरं अगदीच सोपी असतात. त्याप्रमाणेच जटिल समस्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अगदी साधा ठेवा. ती समस्या सुटत का नाहीये याबाबत फेरविचार करा. एखादं काम पार पाडण्यासाठी  दिवस उत्तम आहे. मेडिटेशन केल्यामुळे फायदा होईल. LUCKY SIGN – A lake कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या मित्र-मैत्रिणीने तुमच्यासाठी केलेली छोटीशी गोष्टही तुम्हाला आनंदी करेल.  दिवस अगदी आल्हाददायक आहे. शॉपिंग करण्यावर भर द्याल; मात्र बाहेरचं खाणं टाळा. तुमच्या मनात काय आहे हे बोलून दाखवण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – A Signboard मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नवीन नातेसंबंध मजबूत होण्यास बराच वेळ लागतो. अशा गोष्टींमध्ये संयम बाळगणं गरजेचं असतं. तुटलेला किंवा बिघडलेला संवाद पहिल्यापासून सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. तुम्हाला पूर्ण करता येणार नाही, असं वचन देणं मात्र टाळा; तसंच रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – A Silver wire
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या