सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्ही केलेले थोडेसे प्रयत्न आणि प्रभावी बोलणी यामुळे गोष्टी वेगाने होतील. कामासाठी कुठे जाण्याचा बेत आखला असलात, तर तो पूर्ण होईल. रिअल इस्टेटसंबंधी काम वा नोकरीमध्ये प्रगती दिसेल.
LUCKY SIGN – A Painting
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्ही मुलाखती देत असाल, तर काही चांगल्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. सध्या घराकडे लक्ष देणं तेवढं शक्य होणार नाही. लवकरच एखादी पार्टी आयोजित करण्याची संधी मिळू शकते. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A Squirrel
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
अचानक एखादी गोंधळाची परिस्थिती समोर येईल. अशा वेळी तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणी तरी मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न करू शकतं. एखाद्याच्या तुमच्याबद्दलच्या कमेंटमुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, तर सध्या तरी त्या व्यक्तीला माफ करणं आणि याबद्दल विसरून जाणं योग्य ठरेल.
LUCKY SIGN – A Pet
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्या एक्सचं तुमच्या आयुष्यात अचानक पुनरागमन होईल. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेदेखील तुम्हाला सुचण्यासाठी वेळ लागेल. या व्यक्तीमुळे भूतकाळातल्या काही आठवणी वर येतील. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असलात, तर डेडलाइन पाळणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या.
LUCKY SIGN – Time Stamp
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
आतापर्यंत तुम्ही सर्व अपेक्षांवर मात करत पुढे आला आहात. आता पुन्हा तुम्हाला काही नव्या आव्हानांसाठी सज्ज व्हायचं आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये थोडीफार ओढाताण दिसू शकते; मात्र ते तुम्ही यशस्वीपणे मॅनेज कराल.
LUCKY SIGN – A gold chain
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
भूतकाळात केलेल्या मानसिक वा भावनिक गुंतवणुकीची चांगली फळं आता तुम्हाला मिळतील. आजचा दिवस हा आराम करण्याचा आहे. सध्या कामापेक्षा भविष्याचं नियोजन तयार करण्यावर अधिक भर देणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A rocking chair
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही हळू मात्र अविरत वाटचाल करत आहात. त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहेतच. तुमच्या टीममधली एखादी नवी व्यक्ती सुरुवातीलाच चांगला प्रभाव पाडेल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळू शकते.
LUCKY SIGN – Clear quartz
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
भूतकाळात केलेल्या चांगल्या कामांचं फळ आणि त्यासाठी भरपूर कौतुक तुम्हाला मिळेल. कायदेशीर वादामध्ये तुमचं पारडं जड होईल. तुमच्या जोडीदाराला काही त्रास होऊ शकतो, ज्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A black tourmaline
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्हाला एखाद्या गोष्टीची आजिबात माहिती नसताना त्याबद्दल कमिटमेंट करण्यासाठी दबाव आणला जात आहे. अशा गोष्टीबाबत विचार करा आणि सध्या तर नाही म्हणणंच उत्तम. एखाद्या परिस्थितीमध्ये अनावश्यक ड्रामा करण्याची गरज नाही. एखाद्या सोशल इव्हेंटला हजेरी लावाल.
LUCKY SIGN – A pyramid
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आतापर्यंत तुमचं लक्ष गेलं नाही, अशा एखाद्या गोष्टीकडे जाण्याचा सल्ला तुमचं अंतर्मन देईल. स्वतःच्या भावना अधिक स्पष्टपणे बोलून दाखवण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या वैयक्तिक गोष्टी सांभाळून ठेवण्याची गरज आहे.
LUCKY SIGN – A New Bag
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
आयुष्याबाबतचा तुमचा उत्साह कौतुकास्पद आहे. कित्येक वेळा तुमच्या या उत्साही स्वभावाचं इतरांना आश्चर्य वाटते. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मनापासून आठवण येत आहे; मात्र संवाद साधण्यात आळशीपणा कराल. स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी तुम्हाला अधिक खोलवर जावं लागेल.
LUCKY SIGN – A Fish Tank
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही अधिक प्रयत्न केले असते, तर अधिक चांगली बातमी मिळाली असती हे लक्षात येईल. तुमच्या बऱ्याचशा समस्यांवर तुम्हाला अनोखा उपाय मिळेल. आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. विदेशातून एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
LUCKY SIGN – A Candle stand
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.