Home /News /astrology /

Daily Horoscope : चांगलं सरप्राइझ मिळणार पण एका गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या

Daily Horoscope : चांगलं सरप्राइझ मिळणार पण एका गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या

Daily Horoscope 09 June 2022 : 09 जून 2022 रोजीचं राशिभविष्य पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 9 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्हाला तुमच्या सध्याच्या मनःस्थितीचा पुनर्विचार करावंसं प्रकर्षाने वाटू शकेल. अशी शक्यता आहे की तुम्हाला केवळ भास होत असेल पण बदलाची गरज आहे. एखादं आनंददायी सरप्राइज मिळेल. कोणाचेही Favours स्वीकारू नका. LUCKY SIGN - Symbols वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही वेळेचं नियोजन केल्यास दिवस सुरळीतपणे पार पडण्याची हमी मिळू शकेल. दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं थोडं कठीण जाऊ शकेल. तुमच्या टीमसोबत अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी तुम्हाला नवी कल्पना मिळू शकेल. त्याची काही प्रकारे दखल घेतली जाऊ शकेल. LUCKY SIGN - A vintage clock मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही तुमचे निर्णय झटकन, पण प्रभावीपणे घेता आणि त्याचा परिणाम होतो. अनेक खऱ्या गोष्टी आता उघड होण्याची शक्यता आहे. कामाच्या जागेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नियोजन करा. LUCKY SIGN - A constellation कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या काही जुन्या सवयी बदलण्याचा विचार तुम्ही कराल. घरी थोडे-फार वादाचे प्रसंग ओढवतील. दुसऱ्या व्यक्तीच्या मनःस्थितीचा विचार करण्याचा पर्याय तुम्ही निवडाल. LUCKY SIGN - A gold coin सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आर्थिक व्यवहारांचा विषय मनात सर्वांत प्राधान्याने असेल. तुम्हाला तुमचे असेच होणारे खर्च आटोक्यात आणावे लागतील. लवकरच उत्पन्नाचा एखादा नवा स्रोत सापडण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवा. LUCKY SIGN - A silver wire कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्हाला अगदी रेस्टलेस वाटत असेल आणि तुम्हाला थोडासा मोकळा वेळ काढण्याची इच्छा असेल. तुम्हाला लवकरच तसं करायला मिळेल. स्थिर आरोग्यदायी रूटीनवर लक्ष केंद्रित केल्यास चांगली प्रगती होण्यास मदत होईल. LUCKY SIGN - An alarm clock तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) बिझनेसमन्सनी पूर्वीची काही कायदेविषयक प्रकरणं अर्धवट ठेवली असल्यास त्याकडे आता लक्ष देण्याची वेळ येऊ शकेल. तुमची डील्स बारकाईने तपासा, आढावा घ्या. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. LUCKY SIGN - Fruits वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कामाच्या ठिकाणी काम वाढतच आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रेकची गरज वाटत आहे. तुम्ही अचानक एखाद्या ब्रेकचं प्लॅनिंग करू शकता. एखादी व्यक्ती केवळ काही माहिती काढण्यासाठी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - New car धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवसाची सुरुवात संथ होईल; मात्र संध्याकाळपर्यंत तो चांगलाच वेग पकडेल. सोशल ग्रुपमध्ये मित्रांसोबत रिकनेक्ट होण्यासाठी दिवस चांगला आहे. बँकिंग सेक्टरमध्ये असलेल्या व्यक्तींचा कामाचा ताण वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A new novel मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) जुन्या मित्रांचा ग्रुप तुमच्याशी रिकनेक्ट होण्यासाठी, भेटण्यासाठी वाट पाहत असेल. तुमच्या आई-वडिलांना त्यांच्या निरीक्षणांच्या आधारे काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तुम्हाला आळसावल्यासारखं वाटेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला पुढे ढकलाल. LUCKY SIGN - A rough road कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही ज्यासाठी वाट पाहत आहात, त्या गोष्टीला सातत्याने चालना मिळण्याची शक्यता आहे. काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अगदी शिस्तबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. काही काळासाठी तुम्ही तुमची पॅशन थोडी मागे ठेवाल. LUCKY SIGN - A synchronized car number मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) सकाळच्या वेळात तुम्हाला आळसावल्यासारखं वाटेल. त्यामुळे तुम्ही कामाच्या मूडमध्ये नसाल. दुपारपर्यंत तुमच्यात एकदम चपळाई येईल. तुम्ही तुमच्या रूट्सकडे पुन्हा जाण्याचा विचार करत असू शकाल; मात्र अजूनही त्यासाठी काही काळ आहे. LUCKY SIGN - A ring
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या