Home /News /astrology /

Daily Horoscope : तुमच्या पैशांवर आहे कुणाचा तरी डोळा; जपून करा आर्थिक व्यवहार

Daily Horoscope : तुमच्या पैशांवर आहे कुणाचा तरी डोळा; जपून करा आर्थिक व्यवहार

Daily Horoscope 08 June 2022 : 8 जून 2022 रोजी आर्थिक फायदा संभवतो पण या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यायला हवी.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्हाला वाटतं त्यापेक्षा किती तरी पट अधिक क्षमता तुमच्यात आहे. एखादी नवी गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असलात तर त्यासाठी उत्तम दिवस आहे; मात्र त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास तुम्ही केला आहे याची खात्री करूनच काम सुरू करा. LUCKY SIGN – An indoor plant वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखादा निर्णय घेणं लांबणीवर पडू शकतं. तसंच एखादी चांगली ऑफर समोरून चालून येईल. कामातल्या वा व्यवसायातल्या बेसिक गोष्टी फायद्याच्या ठरतील. तुमच्या तत्त्वांशी बांधील राहण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. LUCKY SIGN – A hibiscus flower मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) गरज नसताना जास्त ताण घेणं टाळा. एखाद्यासोबत पार्टनरशिप करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे; मात्र खर्च, वेळ आणि परिणाम यांची खातरजमा करूनच अंतिम निर्णय घ्या. तुमची प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करणं टाळा. LUCKY SIGN – A Yellow Crystal कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही लपवलेल्या भावना दिसून येतील. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर अतिशय जास्त प्रमाणात भावनिकरीत्या अवलंबून आहात. हे तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्हाला स्वतःवर ताबा मिळवून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. LUCKY SIGN – A blue Sapphire सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) बऱ्याच दिवसांपासून जिची भेट झाली नाही अशी एखादी व्यक्ती तुम्हाला भेटेल. आज महागड्या वस्तू विकत घेण्याची इच्छा होईल. काही जण विदेशात फिरायला जाण्याचं नियोजनदेखील करतील. LUCKY SIGN – A Black tourmaline कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमचा प्रियकर वा प्रेयसी दुसऱ्या ठिकाणी रहायला जात असेल तर तुम्हाला त्यातून लवकर उभारी घेता येणार नाही. तुमची एकमेकांप्रती असणारी ओढ खास आहे.  पैशांचे व्यवहार करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. तुमच्या व्यवहारांवर पाळत ठेवली जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A Cobalt blue stone तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्यातले नेतृत्वगुण वरचेवर सुधारत आहेत. यामुळेच तुमचं मोठ्या प्रमाणात कौतुक होईल. तुम्ही परफेक्शनिस्ट आहात, हा तुमचा गुण तुमच्या फायद्याचा ठरेल. एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल कौतुक वाटेल; मात्र ती तसं सांगणार नाही. घरून मिळालेली एखादी चांगली बातमी तुमचा मूड फ्रेश करेल. LUCKY SIGN – A Shrub वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या कामाच्या पद्धतीवर ज्यांनी यापूर्वी आक्षेप नोंदवला होता, त्या व्यक्तींचं मत आता बदलेल. आर्थिक फायदा संभवतो. एखादी नवी प्रॉपर्टी लवकरच विकत घ्याल. LUCKY SIGN – A Canopy धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या हुशारीच्या बळावर तुम्ही जो परिणाम साधला आहात, ते नक्कीच प्रशंसनीय आहे. पार्टनरशिपचा विचार करत असलात तर  त्यासाठी उत्तम दिवस. घरी मात्र थोडं गोंधळाचे वातावरण राहील. LUCKY SIGN – A milk basket मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एकीकडे काही तरी लपवून ठेवणं आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा तुमचा स्वभाव या सगळ्यामुळे दिवस संमिश्र भावनांचा राहील. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमची विश्वसनीय सूत्र ठरेल. तुम्ही त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकाल. लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाऊ शकाल. LUCKY SIGN – An Island कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी योजना आखाल; मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. तुमची काही कामं पुढेच ढकलली जातील. त्यामुळे थोडा आराम करून योग्य वेळ येण्याची वाट पाहणं उत्तम. कुटुंबीयांनी वा जोडीदाराने दिलेला एखादा सल्ला सध्या तरी उपयोगाचा ठरेल असं वाटत नाही. LUCKY SIGN – A New Signboard मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्याकडून प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना सामोरं जाणं अवघड वाटेल. भूतकाळातल्या तुमच्या काही कामांमुळे तुमच्या मनात भरपूर प्रमाणात अपराधी भावना आहे. तुमचा एखादा जुना पार्टनरदेखील तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देईल. LUCKY SIGN – A Meteor
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या