Home /News /astrology /

Daily Horoscope : अनोळखी व्यक्तीसोबत 'ही' गोष्ट शेअर करू नका; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : अनोळखी व्यक्तीसोबत 'ही' गोष्ट शेअर करू नका; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope 07 June 2022 : तुमचा 7 जून 2022 चा दिवस कसा जाणार. तुमच्या राशीनुसार पाहा तुमचं भविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या मनातल्या संकल्पनेला आकार देण्यासाठी नवीन शिस्तबद्ध प्रकारे त्यावर विचार करणं गरजेचं आहे. काही अकल्पित घटनांमुळे तुमच्या दिनचर्येवर परिणाम होईल. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती स्वतःहून पहिलं पाऊल उचलेल. LUCKY SIGN – A Feather वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमचं ध्येय हे आधीपेक्षा आता अधिक स्पष्ट झालं आहे. तुम्हाला जे सादर करायचं आहे त्याची मागणी वाढू शकते. तुमचा छोटासा व्यवसाय असेल तर तो वाढण्यासाठी एखादी चांगली योजना समोर येईल. LUCKY SIGN – A Bird मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) भौतिक उद्दिष्टांबाबत विचार करण्यात बराचसा वेळ जाईल. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. मनही विचलित होईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत गोपनीय गोष्टी शेअर करू नका. LUCKY SIGN – A Spider कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला काम करण्याची इच्छा होणार नाही. त्यातच रोजची एकसारखी दिनचर्या अजूनच मूड कंटाळवाणा बनवेल. कामाच्या ठिकाणाहून किंवा शाळा-कॉलेजातून एखादी चांगली बातमी मिळेल. LUCKY SIGN – Two Sparrows सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आयुष्यात कोणतीही गोष्ट होणं हा निव्वळ योगायोग नसतो. त्यामागे नक्कीच काही ना काही खास कारण असतं. त्यामुळे तुमच्यासोबत होत असलेल्या घटनाही काही तरी कारणामुळे होत आहेत हे लक्षात घ्या. एखादं रखडलेलं प्रकरण पूर्ण होऊ शकतं. दिवसाच्या सुरुवातीला काहीसा संकोच जाणवेल. LUCKY SIGN – A Ceramic Vase कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दिवस अगदी आळसाचा आहे. काम उद्यावर ढकलण्याची इच्छा होईल. याचा तुमच्या कामावरदेखील परिणाम होईल. त्यामुळे या इच्छेवर मात करणं गरजेचं आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत केल्याने हलकं वाटेल. LUCKY SIGN – Blue pottery तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही एक मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहात. मात्र ही मोठी जबाबदारी घेण्यासाठी मनाची तयारी करणं गरजेचं आहे. काही गोष्टींबाबत अजूनही सखोल विचार करणं गरजेचं आहे. एखादी छोटीशी सहल तुमच्या मनातले कित्येक प्रश्न दूर करून स्पष्टता आणेल. LUCKY SIGN – An Eagle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) जुन्या विश्वासार्ह मित्रांसोबत भेटीगाठी होतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर सध्या तो पुढे ढकला. मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. LUCKY SIGN – A Squirrel धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला मनासारखे परिणाम हवे असतील तर संयम बाळगणं आवश्यक आहे. बिझनेसमध्ये एखाद्या वरिष्ठाने दिलेला सल्ला वा शिफारस फायद्याची ठरेल. तुमच्या कामाबाबत कौतुक करणाऱ्या गोष्टींची चर्चा लोकांमध्ये सुरू असेल. LUCKY SIGN – A Garden मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्हाला तुमच्या निर्णयांवर अधिक ठाम राहण्याची गरज आहे. तुमच्या मनातल्या योजनांप्रमाणे बऱ्याच गोष्टी होणार नाहीत. एखादी नवीन व्यक्ती किंवा ज्युनिअरमुळे तुम्ही झाकोळले जाल. LUCKY SIGN – A Parrot कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) गप्प राहण्याचा नाही तर मनातल्या गोष्टी बोलण्याचा दिवस आहे. तुमचं काम वाढवायचं असेल तर एखाद्याची मदत घ्यावी लागेल. वेळेवर झालेला योग्य संवाद ही सध्याची गरज आहे. LUCKY SIGN – A Nest मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) जलद यश किंवा परिणाम मिळावेत यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो हे लक्षात घ्या. मात्र कामाची गती नक्कीच वाढेल. तुमच्या जोडीदाराचं मन कामात लागणार नाही. तसंच तुमच्याकडेही काहीसं दुर्लक्ष होतंय असं वाटेल. LUCKY SIGN – A Turtle
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या