Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना चांगली बातमी मिळण्याची शक्यता

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना चांगली बातमी मिळण्याची शक्यता

Daily Horoscope 06 May 2022 : तुमचं 06 मे, 2022 चं राशिभविष्य काय सांगतं पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्हाला एखादी लहान असाइनमेंट चटकन मिळू शकते. कदाचित त्यामुळेच भविष्यात मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चांगलं काम करण्याच्या प्रेशरमुळे तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी खर्च कमी होऊ शकतो. LUCKY SIGN - कॅनोपी (Canopy) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत नसल्यास ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. प्लॅन्ड असाइनमेंट चांगल्या प्रकारे अंमलात आणल्यास तुम्ही तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ जाल. एखादी शॉर्ट वर्क ट्रीप करण्याचे योग आहेत. त्यामुळे आनंदी रहाल. LUCKY SIGN - जेड प्लँट (A Jade Plant) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमची एखाद्या इन्ट्रेस्टिंग व्यक्तीसोबत भेट होऊ शकते जी तुमच्यावर प्रभाव पाडू शकेल. येत्या काळात सतर्कता बाळगणं योग्य ठरेल. आपण सावध न राहिल्यास एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते. त्यामुळे नंतर पश्चात्ताप करावा लागेल. LUCKY SIGN - आयर्न टॉवर (An Iron Tower) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटी किंवा क्लायंट चांगली बातमी देऊ शकतात. बहुप्रतीक्षित असाइनमेंटला अप्रुव्हल मिळू शकतं. फिटनेसशी संबंधित एखादी अडचण उभी राहू शकते जिच्याशी तुम्हाला लवकरच डील करावं लागेल. LUCKY SIGN - कुशन (A cushion) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) जी कामं लांबणीवर टाकली आहेत ती लगेच पूर्ण करा. चालढकल करणं हिताचं ठरणार नाही. देशांतर्गत किंवा घरगुती महत्त्वाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. जवळच्या मित्राकडून एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. LUCKY SIGN - स्ट्राईप्स (Stripes) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) अनेक अडथळ्यांमुळे तुमच्या कामाच्या गतीला ब्रेक लागेल. तुम्हाला काही गोष्टी नेहमीपेक्षा थोड्या जास्त पुढे ढकलाव्या लागतील. तुमचं अडकलेलं पेमेंट आज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंद मिळू शकतो. LUCKY SIGN - कॉफी आउटिंग (A coffee outing) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या वाट्याची प्रसिद्धी तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिळेत पण ती तात्पुरतीच असेल. एखादा ऑनलाईन कोर्स किंवा ट्यूटोरियल जॉईन केल्यास तुम्हाला चांगलं वाटू शकतं. एखाद्या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. LUCKY SIGN - ससा (a rabbit) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादी इन्व्हेस्टमेंट तुमच्या चिंतेचं कारण बनू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची टीम तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करेल. घरातील एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे सल्ला मागितला तर त्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. LUCKY SIGN - फुटबॉल मॅच (a football match) धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला काही कौटुंबिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आउटिंगमुळे रुटीनमधून तुम्हाला विश्रांती मिळू शकते. LUCKY SIGN - सोलर पॅनल (A solar panel) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमची पुरेशी तयारी न झाल्यामुळे तुम्ही थोडे नाराज होऊ शकता. तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त टार्गेट ठेवू शकता. तुमच्या क्षेत्रातील एखादी सीनिअर व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा सल्ला देऊ शकते. LUCKY SIGN - फ्लॉवर व्हास (a flower vase) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) काही त्रासदायक लोकांपासून दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यात यश कसं मिळेल याकडे लक्ष द्या. काही लोकांमुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. स्वत:च्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. मेडिटेशन करणं फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN - हनीबी (a honeybee) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कोणीतरी रोमँटिक पद्धतीने पण दुरून तुमचं कौतुक करेल. एखादा नवा दृष्टिकोन किंवा बिझनेस लीड मिळाल्याने तुम्हाला कामाचा व्याप वाढवायला मदत होईल. तुम्हाला लवकरच कोलॅबरेशनची संधी मिळेल. त्यामुळे त्याची तयारी केलीत तरीही चालेल. LUCKY SIGN - टर्क्युअस पॉटरी (a turquoise pottery)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या