Home /News /astrology /

Daily Horoscope on Eid 2022 : ईदच्या दिवशी काय शुभवार्ता मिळणार? पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope on Eid 2022 : ईदच्या दिवशी काय शुभवार्ता मिळणार? पाहा तुमचं राशिभविष्य

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Eid 2022 Horoscope : 3 मे रोजी देशभरात रमजान ईद साजरी होणार आहे. तुमचा हा दिवस कसा जाणार पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या नियंत्रणाखाली नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही विनाकारण ताण घेत असल्याची शक्यता आहे. एखाद्या परिस्थितीत खूपच वाद किंवा संघर्ष असतील, तर तुम्ही नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आत्ताच वेगळे मार्ग स्वीकारावेत. अनेक दिवस लक्ष विचलित झाल्यानंतर आता जीवन सुरळीत होईल. LUCKY SIGN - Emerald green वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) पुढे काय होऊ घातलं आहे, याची चिंता सतावत असेल. तुमची सध्याची जीवनशैली जशी आहे, तशी ती होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट केले आहेत; पण कोणती तरी गोष्ट तुम्हाला मागे खेचून धरत असल्यासारखं तुम्हाला वाटत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्ती चांगली कामगिरी करू शकतील. LUCKY SIGN - A sunrise मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) सकारात्मक संकेत बऱ्याच काळापासून मिळत आहेत; मात्र तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयारीत असलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे बरंच काही चाललं आहे, ते तुम्ही शोधून काढाल. घरच्या पातळीवर सध्या सगळं काही ठीकठाक, सुरळीत आहे. ही चांगली बातमी आहे. LUCKY SIGN - A fish net कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या आर्थिक अडचणी अखेर सुटत आहेत आणि त्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न एकत्रितपणे सुटतील. एखादा संदर्भ विकसित होत असल्याबद्दल तुम्हाला सरप्राइज मिळेल. नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. LUCKY SIGN - An amber stone सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) अचानक एखाद्या ठिकाणाहून एखादी नवी संधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. तुमच्या रेग्युलर रूटीनमध्ये त्यामुळे जरा वेगळी हालचाल होईल. त्याची तुम्हाला गरज होईल. काही आध्यात्मिक गोष्टी कराव्यात, अशी इच्छा तुम्हाला होईल. LUCKY SIGN - Violets कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) एखाद्या अपेक्षित असलेल्या गोष्टीचा निकाल उत्साहवर्धक असेल. त्यामुळे भविष्यातल्या वाटचालीसाठी हवी असलेली स्पष्टता मिळू शकेल. एखाद्या नव्या सकारात्मक घडामोडीमुळे तुमचा दिवस उत्तम होईल. LUCKY SIGN - Ruby red तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या आयुष्यातल्या कंटाळवाण्या, चाकोरीबद्ध गोष्टी लवकरच निघून जातील. तुमच्यावर विश्वास असलेल्या व्यक्तीचं मत आता कदाचित बदलू शकेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षितरीत्या सकारात्मक परतावा मिळेल. LUCKY SIGN - A silk stole वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) राजकारण, कला आणि सिनेमा या क्षेत्रात असलेल्या सर्वांना आजचा दिवस उत्साहवर्धक, प्रेरक असेल. संघटित, शिस्तबद्ध विचारप्रक्रिया अंमलात आणण्यासाठी संधी मिळेल. तुमच्या आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीचा खोलवर प्रभाव पडेल. LUCKY SIGN - A white rose धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कामाचं ठिकाण बदलण्याचे संकेत आहेत. करायचं असलेलं काम आणि उपलब्ध वेळ यांचं प्रमाण व्यस्त असल्याने तुमची चिडचिड होईल. तुमच्या आवडीचं काम निवडून तुम्ही करू शकता. पैशांचा प्रवाह सुरळीत राहणं अपेक्षित आहे. LUCKY SIGN - Sky blue मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्हाला सध्या Misfit असल्यासारखं वाटत आहे; मात्र तुम्ही स्वतःला जुळवून घेण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. तुमच्या मनात बदलाच्या विचारांची साखळी असेल; मात्र त्याची सध्या शिफारस नाही. तुम्हाला रिफ्रेश वाटण्यासाठी छोटी ट्रिप गरजेची वाटू शकेल. LUCKY SIGN - A neon green कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमचा आत्मविश्वास इतर अनेकांनाही प्रेरणा देतो. त्यामुळे तुमच्या अनेक समस्या त्यातूनच सुटतील. अनेक कल्पनांवर तुम्ही एकाच वेळी विचार करत आहात; मात्र नेमकं कशावर स्थिर राहावं, हे तुम्हाला कळत नाहीये. LUCKY SIGN - A goldfish मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमचं सावध मन तुम्हाला अनेक गोष्टी सांगत आहे; पण तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला वेगळं काही तरी सांगेल. एखाद्या जवळच्या नातेवाईकाला तुमचा सल्ला किंवा मदत लागेल. नवं वेलनेस रूटीन सुरू करण्याचा हा कालावधी आहे. LUCKY SIGN - A cobalt blue
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या