सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या ब्रेकची गरज आहे तो मिळेल. मित्रमैत्रिणींसोबत छोटंसं गेट-टुगेदर होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या कामावर बऱ्याच दिवसांपासून मेहनत घेत आहात ते आता आकार घेऊ लागेल. एखादी जुनी निराशा संपुष्टात येईल.
LUCKY SIGN – Lillies
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा वा तिच्याशी बोलण्याचा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर आज यश मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातल्या विशेष बदलाचं तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
LUCKY SIGN – A Red rose
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमचं दैनंदिन आयुष्य आता हळूहळू पूर्वपदावर येईल. तुमचं मन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. एखादा जवळचा मित्र भेटून तुमचा उत्साह वाढवेल.
LUCKY SIGN – A Pearl Necklace
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
खयाली पुलाव खाण्यात आणि भूतकाळातल्या आठवणींत रमण्यातच दिवस निघून जाईल. तुमचं कौशल्य माहिती असणारी एखादी व्यक्ती तुमच्याशी स्पर्धा करील. स्वतःला आराम देण्याचा आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आहे.
LUCKY SIGN – A Crystal cluster
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमचं काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यामुळे तुमची ओढाताण होईल. रागावर शक्य तेवढं नियंत्रण ठेवा. सध्या कित्येक गोष्टींचा शेवट करण्याची वेळ आहे.
LUCKY SIGN – A Tile
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमच्या सुरळीत चाललेल्या दैनंदिन आयुष्याला थोडासा तडा जाईल. वेळेबाबत एखाद्याला प्रॉमिस करण्यापूर्वी थोडा विचार करा. रखडलेले आर्थिक व्यवहार सुरू होतील.
LUCKY SIGN – An Old favourite
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
कामाच्या ठिकाणी एखादं संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला सामोरं जाण्याची वा ते टाळण्याची पूर्वतयारी करा. तुमच्या हावभावांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्यावर विश्वास असणारी एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवून असेल.
LUCKY SIGN – A new trail
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
एखादी मुलाखत देणार असलात तर चांगली पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. एखाद्याने केलेल्या टीका-टिप्पणीमुळे तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करत आहात. त्यामुळे बाकी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. चांगला निकाल येण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – An indoor Game
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
एखादं आव्हान स्वीकारण्यापूर्वी आधी त्याबाबत संपूर्ण माहिती घ्या. नेहमीप्रमाणे तुमच्या आईचा तुम्हाला पाठिंबा असेलच. तुमच्या मेंटॉरचा एखादा सल्ला तुम्हाला बराच फायद्याचा ठरू शकतो.
LUCKY SIGN – A Marigold flower
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
महत्त्वाची गोष्ट आणि अर्जंट करावी लागणारी गोष्ट या दोन्हींबद्दल द्विधा मनस्थिती असेल. दिवस बरासचा खर्चिक राहिल. गोड खाण्याची भरपूर इच्छा होईल मात्र त्यावर आवर घालणं उत्तम.
LUCKY SIGN – A Garden
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमच्यातील कलाकौशल्य सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळेल. कोणताही सल्ला स्वीकारण्यासाठी तुमचं मन तयार होणार नाही. तुमचं ढोंग तुम्ही अधिक काळ लपवू शकणार नाही.
LUCKY SIGN – A New Wallet
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखादी नवीन गोष्ट सुरू करत असाल तर खबरदारी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही प्रभावी व्यक्तींची भेट होईल. एखाद्या आध्यात्मिक ठिकाणाला भेट देण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - Daisies
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.