दिल्ली, 30 ऑगस्ट : आचार्य चाणक्य
(Acharya Chanakya) हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य
(Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन
(Life) जगतांना उपयोगात येतात. चाणक्य नीतित जीवनाच्या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल सांगितलं गेलं आहे. व्यक्तीचे नातेसंबंध
(Relesion) त्यातून येणारी सुख-दु:ख आणि आयुष्यात येणाऱ्या इतर समस्यांचं निराकरण केलं गेलं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार लग्नाआधीच आपल्या जोडीदाराला मधले 5 गुण ओळखायला हवेत. त्यामुळे कौटुंबिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं. पाहुयात कोणते आहेत ते 5 गुण
1. आचार्य चाणक्य यांच्यामते आपला जोडीदार धार्मिक विचारांचा आहे का हे आधीच पाहिले पाहिजे. धार्मिक विचारांची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करते. त्यामुळेच लग्नानंतर अशा जोडीदारांचा भाग्योदय होतो.
(
चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन)
2. मन संतुष्ट असेल तर, माणूस सुखी होतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी, अशा व्यक्ती समाधानी असतात. या व्यक्ती कधीच आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. उलट प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभे राहतात.
(
तुम्हालाही आवडतं का असं दूध? बॅक्टेरियामुळे होतील घातक आजार)
3. आपला होणारा जोडीदार धैर्यवान आहे का हे लग्नाआधी जाणून घ्या. कारण आयुष्य प्रत्येक वळणावर सारखं नसतं. अडचणी, कठीण प्रसंग, संकटं आयुष्यात येतच असतात. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समजदारपणे निर्णय घेण्याची ताकद जोडीदारात असायला हवी.
4. आपला होणारा जोडीदार स्वतःच्या रागावर किती नियंत्रण ठेवू शकतो हे देखील पाहायला हवं. प्रत्येकालाच थोडा फार राग येतो. मात्र, ज्या व्यक्तीचं आपल्या रागावर नियंत्रण नाही तो चांगला जोडीदार होऊ शकत नाही.
(
व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips)
5. आचार्य चाणक्य यांच्यामते प्रत्येक व्यक्तीने गोड बोललं पाहिजे, गोड बोलण्याने सगळी कामं होऊ शकतात आणि इतरांची मनही जिंकता येतात. गोड बोलणाऱ्या लोकांच्या घरात कायम लक्ष्मीचा वास असतो.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.