मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींवर अमावस्येचा अशुभ प्रभाव; जपून राहा

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींवर अमावस्येचा अशुभ प्रभाव; जपून राहा

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

आज 01 एप्रिल 2022 रोजी चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2022) आहे. पाहा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार.

आज दिनांक 01 एप्रिल 2022. शुक्रवार. आज अमावस्या दुपारी 11.43 नंतर संपेल. शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून चंद्र आज मीन राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष राशी स्वामी मंगळ दशम स्थानात शनीसोबत ही ग्रहस्थिती अचानक अडचणींमध्ये वाढ करेल. व्यय चंद्र रवी अशुभ आहेत. दिवस मध्यम जाईल. वृषभ शुक्राचे गुरूसोबत भ्रमण स्त्रियांना शुभ असून कार्यक्षेत्रात मदत करेल. आर्थिक आणि शारीरिक ताण कमी होईल. काही विशेष लाभदेखील मिळतील. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध दशम स्थानात रवी चंद्रासोबत असून काही नवीन संधी मिळवून देतील. महत्त्वाचे संपर्क होतील. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आज भाग्यस्थानात आहे. घरी आणि कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती ठीक राहिल. दिवस उत्तम. सिंह शनी मंगळ षष्ठ स्थानात असून जवळच्या नातेवाईकांना काही त्रास होईल. चंद्र रवी अध्यात्मिक लाभ मिळवून देतील. दिवस मध्यम आहे. कन्या आज आर्थिक लाभ आणि वैवाहिक सौख्य देणारा दिवस आहे. घरात शांत रहा. फार ताण घेऊ नका. संतती चिंता वाटेल. अमावस्येचा अशुभ प्रभाव जाणवेल. दिवस मध्यम जाईल. तूळ मंगळ शनी चतुर्थ तर बुध रवी चंद्र सहाव्या स्थानात आहेत. स्वतःची काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. भेटी होतील. दिवस बरा जाईल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ शनी तृतीय स्थानात, गुरू शुक्र चतुर्थ स्थानात. हळूहळू परिस्थिती सुधारेल. पंचम चंद्र आहे. संततीची काळजी घ्या. दिवस बरा जाईल. धनु तृतीय गुरू शुक्र आणि चतुर्थ रवी चंद्र शुभ असून प्रकृतीत सुधारणा घडवून आणतील. धन स्थानातील शनी मंगळ मात्र अजूनही कठीण आहे. दिवस मध्यम. मकर शनि मंगळ काही विशिष्ट ताण देतील चंद्र त्यात सुधारणा करेल. दिवस फारसा अनुकूल नाही. तुम्ही व्यस्त राहाल. प्रकृती जपा. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ धन स्थानातील ग्रह आर्थिक लाभ देतील. राशीतील गुरू शुक्र जोडीदाराला शुभ ठरेल. जोडीने दिवस आनंदात घालवाल. मीन बारावा गुरू, राशीतील रवी चंद्र आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस ताणाचा ठरेल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या