पुणे, 1 जुलै : माणसाचे भविष्य जाणून घेण्याची म्हणजे ज्योतिष. आपल्या भविष्यात काय दडलंय हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहेत. कर्क राशीसाठी जुलै महिना कसा असेल? हे आपण पाहणार आहोत. पुण्यातील ज्योतिष शास्त्र अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी हे भविष्य सांगितले आहे. सिद्धेश्वर मारटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार “या महिन्यामध्ये कर्क राशीच्या दुसऱ्या स्थानामध्ये शुक्र आणि मंगळ यांचे आगमन होत आहे. या राशीच्या दशमस्थानात गुरु, राहू यांचं भ्रमण चालू आहे. अष्टमास्थानामध्ये शनिचे भ्रमण चालू आहे. 30 जूनला नुकताच मंगळ कर्क राशीमध्ये प्रवेश करून नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करतोय, शुक्र धनस्थळ पूर्ण करणार आहे. हा बदल या राशीसाठी उत्तम असून या काळामध्ये कर्क राशीच्या लोकांना आर्थिक आवक चांगली राहील. नोकरी व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
रवी सुद्धा कर्क राशीतच काही दिवसांनी आहे. कर्क राशीच्या लोकांना सामाजिक पत प्रतिष्ठा, मानसन्मान, मोठा पद किंवा प्रमोशन या गोष्टी या महिन्यात मिळण्याची शक्यता राहील. सामाजिक, राजकीय दृष्टीने त्यांना मोठा अधिकार किंवा मोठ्या पदाची प्राप्ती होऊ शकते. त्या जोडीला नोकरी स्तरातून कर्क राशीमध्ये तुला वक्री होणार आहे. याचा परिणाम या लोकांच्या आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम होईल. Shukra Gochar 2023 : चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, पाहा कुणाला होणार फायदा? सध्या शनि अष्टम स्थानात असल्यामुळे काही तब्येतीच्या समस्या संभवतील. त्यानुसार या राशीतील लोकांनी हनुमानाची उपासना करणे फायदेशीर राहील. शनिवारी गोरगरिबांना दान केल्यास आरोग्याचे प्रश्न सुटतात. कर्क राशीतील लोकांची कल्पनाशक्ती या महिन्यात उत्तम राहील. लिखाण किंवा कागद प्रसिद्धीला देणे किंवा साहित्यातील लिखाण यादृष्टीने लेखक आणि पत्रकारांना यश मिळेल. शेअर मार्केट एजन्सीचे व्यवसाय यात सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे. चांगली संधी मिळाल्यास या राशीतील लोकांनी नोकरीमध्ये बदल करण्यास हरकत नाही. त्याचबरोबर घर किंवा वाहन खरेदी या महिन्यात होण्याची शक्यता आहे. एकूण विचार करता कर्क राशीला हा जुलै महिना आनंददायी, आर्थिक सुबलता देणारा आहे, असं भविष्य मारटकर यांनी सांगितलं आहे.

)







