मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /बुध-शुक्राच्या संयोगातून तयार झाला लक्ष्मी-नारायण योग, या राशींसाठी ठरणार भाग्यशाली

बुध-शुक्राच्या संयोगातून तयार झाला लक्ष्मी-नारायण योग, या राशींसाठी ठरणार भाग्यशाली

लक्ष्मी-नारायण योग

लक्ष्मी-नारायण योग

बुध आणि शुक्राने राशी बदलून शनीच्या मकर राशीत प्रवेश केल्याने लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होईल. ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी नारायण राजयोगाचे वर्णन अतिशय शुभ योग म्हणून गेले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 डिसेंबर : या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात बुद्धिमत्ता, शक्ती आणि कला-कौशल्याचा कारक बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत बुधाचे संक्रमण असल्याने काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील. ज्योतिषशास्त्रानुसार 28 डिसेंबर बुधाने राशी परिवर्तन करून मकर राशीत प्रवेश केला आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे म्हणजे आज 29 डिसेंबरला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल.

बुध आणि शुक्राने राशी बदलून शनीच्या मकर राशीत प्रवेश केल्याने लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होईल. ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी नारायण राजयोगाचे वर्णन अतिशय शुभ योग म्हणून गेले आहे. त्यातून काहींना खूप आर्थिक फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया 29 डिसेंबर 2022 पासून कोणत्या राशीच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार आहेत.

या राशींना लक्ष्मी-नारायण योगाचा फायदा

मेष - बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण प्रगतीही होईल. व्यवसायात वाढ होईल. धनलाभ होईल, आर्थिक स्थिती चांगली राहील. विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ आहे.

मिथुन- 28 डिसेंबरपासून बनत असलेला लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल. धनलाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सर्वांच्या सहकार्याने व आनंदाने काळ उत्तम जाईल.

तूळ- बुध आणि शुक्राचे राशी परिवर्तन देखील तूळ राशीच्या लोकांसाठी उत्कृष्ट परिणाम देईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रगती होईल. आजवर ज्या समस्या होत्या त्या आता दूर होतील. धनलाभ होईल. जुनी आर्थिक समस्या दूर होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

हे वाचा - शुक्राचे होणार राशी परिवर्तन, या 4 राशीच्या लोकांचे वाढणार इनकम सोर्स

वृश्चिक- बुध आणि शुक्राच्या संक्रमणाने तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांना मानसिक शांती देईल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya, Rashichark