मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /बुध निराश नाही करणार! मकरमध्ये झालेलं गोचर या राशींना समाधानाचे दिवस दाखवणार

बुध निराश नाही करणार! मकरमध्ये झालेलं गोचर या राशींना समाधानाचे दिवस दाखवणार

बुधाचे राशीपरिवर्तन

बुधाचे राशीपरिवर्तन

बुध आजपासून 27 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत राहील आणि 27 फेब्रुवारीला दुपारी 04:55 वाजता मकर राशीतून बाहेर पडेल आणि कुंभ राशीत प्रवेश करेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : आज 07 फेब्रुवारी रोजी बुध ग्रहाने राशी बदलली आहे. बुध ग्रहाने आज सकाळी 07:38 वाजता शनिदेवाच्या मकर राशीत प्रवेश केला. बुध आजपासून 27 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत राहील आणि 27 फेब्रुवारीला दुपारी 04:55 वाजता मकर राशीतून बाहेर पडेल आणि कुंभ राशीत प्रवेश करेल. 20 दिवस मकर राशीत राहिल्याने बुध ग्रहाच्या राशीबदलाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम होईल. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी 12 राशींवर बुध संक्रमणाचा प्रभाव कसा राहील याची माहिती दिली आहे.

बुध संक्रमण 2023 -

मेष : बुध गोचरामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. घर, वाहन, मालमत्ता मिळण्याचे योग आहेत. पदोन्नतीची संधी मिळू शकते.

वृषभ: बुधाचा राशी बदल तुम्हाला भाग्यवान बनवू शकतो, नोकरदार लोकांना मोठे पद मिळू शकते. नोकरीचे किंवा परदेशात राहण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मिथुन : बुधाचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्याविरुद्ध षडयंत्र रचले जाऊ शकते. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे.

कर्क : विवाहाची बाब निश्चित होऊ शकते. व्यवसायात भागीदार मिळणे फायदेशीर ठरेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल.

सिंह : बुध गोचरामुळे तुमचे शत्रू सक्रिय राहतील, कामाच्या ठिकाणी सावधगिरीने काम करावे. परदेशात शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे.

कन्या : बुधाचा राशी बदल तुमच्यासाठी अपार यश मिळवून देणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. लव्ह लाईफ मजबूत होईल आणि प्रणय वाढेल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल.

तूळ : बुध ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे भाग्य चमकेल. चांगली बातमीही मिळू शकते. मात्र, या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे. तुम्ही काळजीपूर्वक गुंतवणूक करा किंवा पैशांचा व्यवहार जपून करा.

वृश्चिक : बुधाच्या गोचराने परदेशात नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये रोमांस वाढेल, ज्यामुळे नाते मजबूत होईल. तुमच्यासाठी काही कठीण प्रसंग निर्माण होतील, परंतु संयम आणि विवेकाने तुम्ही त्यातून बाहेर पडाल.

धनु : बुधाच्या प्रभावाने धन क्षेत्र मजबूत होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही स्वतःसाठी नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता. तब्येत ठीक राहील. कौटुंबिक वाद मिटतील.

मकर: बुधाचे संक्रमण तुमची पद-प्रतिष्ठा वाढवणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील.

हे वाचा - श्रीमंत लोकांचा यादीत तुमचा अंक येतो का? तुमच्याही जन्मदिवसाची बेरीज ही आहे का?

कुंभ : या काळात वादविवादापासून दूर राहावे. काही समस्या असल्यास, त्यावर तडजोड करणे शहाणपणाचे ठरेल. पैसे अडकण्याची शक्यता आहे, विचारपूर्वक गुंतवणूक करा. यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल.

मीन: नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या कामासाठी तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो. विवाहाची बाब निश्चित होऊ शकते. नवविवाहितांना अपत्यप्राप्तीची शक्यता आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark