मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

प्राण्यांकडूनही मिळतात आगामी घटनांचे संकेत? पाहा काय आहेत प्रमुख समजुती

प्राण्यांकडूनही मिळतात आगामी घटनांचे संकेत? पाहा काय आहेत प्रमुख समजुती

पशू-पक्षी, प्राणी यांच्या कृतीतून मिळणाऱ्या संकेताचा आयुष्यावर परिणाम होतो अशी अनेकांची समजूत आहे

पशू-पक्षी, प्राणी यांच्या कृतीतून मिळणाऱ्या संकेताचा आयुष्यावर परिणाम होतो अशी अनेकांची समजूत आहे

पशू-पक्षी, प्राणी यांच्या कृतीतून मिळणाऱ्या संकेताचा आयुष्यावर परिणाम होतो अशी अनेकांची समजूत आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 नोव्हेंबर : आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी कुटुंबातील मोठ्या व्यक्ती, देवाचे आशीर्वाद घेतो. कामात यश मिळावं, हा त्या मागचा उद्देश असतो. काहीवेळा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा प्रवासाला निघताना मांजर, कुत्रा आडवा जाणं, आसपासची एखादी व्यक्ती शिंकणं असे प्रकार घडतात. काही लोक अशा प्रकारांना विशिष्ट संकेत मानतात तर काही जण याकडे दुर्लक्ष करतात.

पशू-पक्षी, कुत्रा, मांजर यांच्या एखाद्या कृतीत शकुन-अपशकुनाविषयी विशिष्ट संकेत दडलेले असतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. रस्त्यावरून जाताना मांजर आडवं जाणं हे अशुभ संकेत मानले जातात. अशा प्रकारचे शुभाशुभ संकेत कावळा, कुत्रा, उंदीर, दूध तापणं, एखाद्या व्यक्तीचं शिंकण आदीतून मिळतात, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. पशू-पक्षी, प्राणी यांच्या कृतीतून मिळणाऱ्या संकेताचा आयुष्यावर परिणाम होतो अशी अनेकांची समजूत आहे, या विषयी जाणून घेऊया. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या विषयीची माहिती दिली आहे.

एखादया व्यक्तीला शिंक येणं, कुत्रा किंवा मांजर रडणं यासारख्या गोष्टी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही शकुन, अपशकुनाशी निगडीत मानल्या जातात. भारतात शकुन शास्त्राच्या माध्यमातून अशा घटनांमागे दडलेले संकेत सहजपणे जाणून घेता येतात. पशु-पक्षांशी संबंधित एखादा संकेत शुभ असू शकतो. तसेच त्यांची एखादी कृती अपशकुनाचे ही संकेत देते.

चमत्कारिक आहे 'हा' Mobile number; तुमचा असेल तर आयुष्यातील अनेक समस्या सुटल्याच समजा

एखाद्या व्यक्तीचं शिंकणं हे केवळ भारतातच नाही तर परदेशांतही शकुन-अपशकुन मानलं जातं. जर घरातली एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी निघाली असेल, तर त्यावेळी एखादी व्यक्ती अशा व्यक्तीच्या पाठीमागे शिंकली किंवा टोकलं तर ते अशुभ मानलं जातं. मात्र जर तिच व्यक्ती दोनवेळा शिंकली तर ते शुभ मानलं जातं. माणसाप्रमाणे कुत्रा आणि मांजराचं शिंकणं हे अशुभ मानलं जातं.

हिंदू धर्मात श्वानाला भगवान भैरोवाचं वाहन मानलं गेलं आहे. घराचं रक्षण करणारा कुत्रा बऱ्याचदा शकुन-अपशकुनाचे संकेत देत असतो. जर तुमच्या घराच्या जवळ येत एखादा कुत्रा रडू लागला तर तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार आहे, असं समजावं. तसेच कुत्रा जर तुमच्या घरातली एखादी वस्तू घेऊन गेला तर ही गोष्ट अशुभ मानली जाते.

गुरू ग्रहाची आता सरळ चाल; या 6 राशीच्या लोकांचे सोनेरी दिवस होणार सुरू

कुत्र्याप्रमाणे घराच्या आसपास जर मांजर रडत असेल तर तो मोठा अपशकुन मानला जातो. जर दोन मांजरी घरात येऊन एकमेकांशी भांडू लागल्या तर एखाद्या मोठ्या संकटाचे हे संकेत असतात. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाले असताना मांजर आडवी गेली तर तोदेखील एक मोठा अपशकुन मानला जातो.

हिंदू धर्मात घुबडाला लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं. पण तुमच्या घराच्या आसपास घुबडाचा वावर शुभ मानला जात नाही. जर घुबड एखाद्या घरावर येऊन बसत असेल तर ते घर लवकरच उजाड होणार असं समजावं. जर एखादं घुबड घराच्या छतावर येऊन रडत असेल तर घरातल्या कर्त्या व्यक्तीवर संकट येणार असं समजावं.

घराच्या समोर किंवा छतावर येऊन एखादा कावळा ओरडत असेल तर घरी पाहुणे येणार आहेत, असं मानलं जातं. मात्र कावळ्याशी संबंधित काही संकेत अपशकुन देखील असतात. कावळ्याने एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श केला किंवा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा फिरत असेल तर या दोन्ही गोष्टी अशुभ मानल्या जातात. हे संबंधित व्यक्तीवर संकट येण्याचे संकेत मानले जातात.

कशा असतात नंबर 1 च्या व्यक्ती? 'हे' असतात विशेष गुण

ज्योतिषशास्त्रात दूध हे चंद्राचं प्रतीक मानलं जातं. जर किचनमध्ये गॅसवर ठेवलेलं दूध उकळून वारंवार जमिनीवर सांडत असेल तर संबंधित व्यक्तीला चंद्राशी संबंधित दोष लागतात. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीचं मन कायम अस्वस्थ राहतं. गॅसवर तापायला ठेवललं दूध ओतू गेलं तर घरातील लोकांची भांडणं होऊ शकतात, असं देखील मानलं जातं.

हिंदू धर्मात उंदीर हे भगवान श्री गणपतीचं वाहन मानलं जातं. घरात एक किंवा दोन उंदरांचा वावर शुभ मानला जातो. पण अचानक त्यांची संख्या वाढली आणि त्यांनी वस्तू कुरतडण्यास सुरुवात केली तर हे भविष्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीचे संकेत मानले जातात, अशी काही जणांची समजूत आहे.

टीप : ही माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे. News18 लोकमत कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला चालना देत नाही.

First published:

Tags: Astrology and horoscope