दिल्ली,06 जुलै : प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला महत्त्व आहे. पैसा सर्वस्व नसला तरी आयुष्यातल्या काही महत्वाच्या सुविधा मिळवण्यासाठी पैसा लागतो. आयुष्यामध्ये नातीगोती, प्रेम, चांगलं आयुष्य यांच्याबरोबरच पैसा देखील असावा लागतो. पैसा,संपत्ती,ऐश्वर्य यांचा संबंध ज्योतिषशास्त्राशी (According to Astrology) आहे. जगात अनेक प्रकारची माणसं असतात काहीना पैसा प्रिय असतो (Money Affection) तर, काहींना नाती हवी असतात, काहींना संसारिक सुखा हव असतं या सगळ्यावर ग्रहांचा प्रभाव पडत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार केतूला क्रुर ग्रह मानलं जातं. केतूचं नावही ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती उत्पन्न होते. मात्र,ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू नेहमीच अशुभ फळ देतात असं नाही. केतू काही राशीच्या लोकांना चांगले परिणाम आणि मानसन्मान देखील मिळवून देतो.
(Chanakya Niti: तोडांवर ताबा ठेवा नाहीतर संपत्तीही गमवा; होईल लक्ष्मीची अवकृपा)
ज्योतिष शास्त्रानुसार केतूचा अर्थ वर्चस्व होतो. ज्यांच्या जन्म पत्रिकेमध्ये केतू इतर चांगल्या ग्रहाबरोबर एखाद्या घरात असतो त्याला आयुष्यात सर्वश्रेष्ठ फळ प्राप्त करून देतो. त्याचा स्वभाव मंगळ ग्रहाची मिळताजुळता आहे. केतू हा साहस आणि पराक्रमाचं प्रतिक मानला जातो.
केतूचं वैशिष्ट्य
आयुष्यात केतूचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. केतू हा ग्रह जन्म पत्रिकेमध्ये आठव्या स्थानामध्ये असेल तर, अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. याला छाया ग्रहही म्हटलं जातं. केतू ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाला बळ प्राप्त करून देतो.
(अविचाराने वागतात 5 राशीचे लोक;असते नुसती घाई)
शुभाशुभ परिणाम
केतूचा संबंध जन्म पत्रिकेमध्ये दुसऱ्या आणि आठव्या स्थानाशी असतो. या दोन्ही स्थानांमध्ये केतू असेल तर, सगळ्यात जास्त शुभ फळं मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार केतू आणि मंगळ ग्रहाची युती म्हणजे अंगारक आयोग आहे. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये अशी युती आहे. त्याला अडचणींचा सामना आयुष्यभर करावा लागतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.