मुंबई, 29 नोव्हेंबर : तसंतर खोटं बोलायला कोणाला आवडतं नाही. पण, काही कारणामुळे खोटं बोलायची वेळ येते शिवाय काही लोकांचा स्वभावच खोटं बोलणार असतो. कित्येक लोक खोटं बोलण्यात सराईत असतात, ते काय खरं आणि काय खोटं बोलतात याचा अंदाजही येणं अवघड असतं. त्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला धजावत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या राशीवरून ओळखता येतात. 12 राशींपैकी 5 राशी अशा आहेत की, ज्या वेळेवर खोटं बोलू शकता. पाहुयात कोणत्या राशी आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीचे लोक बाता मारण्यात पटाईत असतात. खोटं कसं रेटून बोलावं हे या लोकांना चांगलं माहिती असतं. शिवाय खोटं बोलणं पकडलं गेल्यानंतर देखील त्यावर पांघरूण कसं घालायचं हे सुद्धा त्यांना माहिती असतं. त्यामुळेच वृश्चिक राशीचे लोक बिजनेसमध्ये पुढे जातात. असे लोक नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी खोटं बोलतात.
सिंह रास
लोकांनी आपल्याकडे लक्ष द्याव असं सिंह राशीच्या लोकांना वाटत असतं. त्यामुळेच गरज पडली तर, ते खोटं बोलायला तयार असतात, सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावरच रहावं यासाठी काहीही करायला तयार असणारे हे लोक. खोटं बोलल्यावर पकडलं गेल्यावर सुद्धा ते आपलं खोटे लपवण्याचा प्रयत्न करतात. सतत आपल्यावरचा फोकस कमी होतो की, काय अशी भीती त्यांना वाटत असते आणि त्यामुळेच ते खोटं बोलायला तयार असता.
मिथुन रास
मिथुन राशीचे लोक मॅनिप्युलेट करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. यांचं व्यक्तिमत्व दुटप्पी असतं. त्यामुळे लोकांना बोलण्यात गोलगोल फिरवत राहतात. त्यांच्या या गोलगोल गप्पांवर लोकांचाही विश्वास बसतो. आपलं कम्युनिकेशन स्किल आणि चार्मिंग पर्सनालिटीमुळे ते सहजपणे खोटे बोलतात आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांमध्ये खोटं बोलण्याची क्षमता ठासून भरलेली असते. हे लोक इतक्या सहजपणे खोटं बोलतात की लोकांचा त्यांच्यावरती विश्वास बसतो. हे लोक नेहमीच खोटं बोलत नाहीत मात्र यांचा खोटं पकडणं कठीण असतं. खोटं बोलण्यात एक्सपर्ट असण्याचं वरदान त्यांना मिळालेला आहे.
हे वाचा - हातात बॅग धरण्याची पद्धत दर्शवते तुमचं व्यक्तिमत्त्व; पाहा तुमचं काय आहे?
तुळ रास
तूळ राशीचे लोक मोठ्या मनाचे असतात. दुसऱ्यांची मनं दुखावण्याच्या भीतीने या राशीची लोक खोटं बोलतात. या लोकांना दुसऱ्यांची मनं दुखवायला आवडत नाही. गरज पडली तर. परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी हे लोक खोटं बोलू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.