नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट केले तरी आपयशी ठरत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 4 राशी (Zodiac Sing) अशा आहेत ज्यांना भाग्यवान मानलं जातं. त्यांचं भाग्य (Luck) अतिशय उत्तम असतं. जे काम हातात घेतात त्या कामांमध्ये ते यश मिळवतात जाणून घेऊया अशा धनवान राशी
वृषभ रास
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह धनसंपत्ती, विलास आणि रोमान्सचा कारक मानला जातो. वृषभ राशीचे लोक विलासी आणि वैभवशाली आयुष्य जगतात. ते सतत संपत्ती मिळवण्याचं मार्ग शोधत असतात. या लोकांचं भाग्य अतिशय उत्तम असतं. वृषभ राशीच्या लोकांना सुंदर आणि लक्झरिअस लाईफ जगण्यात आणि वस्तू खरेदी करण्यात रस असतो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे लोक प्रचंड मेहनत करतात. जी गोष्ट करण्याचा मनामध्ये निश्चय करतात ती गोष्ट करून दाखवतात.
(तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत)
वृश्चिक रास
वृश्चिक राशीचे लोक श्रीमंत असतात यांना भौतिक सुखाचा आनंद द्यायला आवडतो. मोठ्या गाड्या, मोठं घर, महागड्या वस्तू यांना आकर्षित करतात. आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी लोक प्रचंड प्रयत्न करतात. जगाला पाहण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. जी गोष्ट मनामध्ये ठरवतात ती मिळवूनच शांत बसतात.
(पळून पळून किती पळणार! अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल)
कर्क रास
कर्क राशीचे लोक भाग्यशाली राशींमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. या राशीच्या लोकांचं नशीब बलवत्तर असतं. आपल्या कुटुंबावर यांचे खूप प्रेम असतं. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कौटुंबिक सुखासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी शक्यते प्रत्येक प्रयत्न करतात.
(हातपाय खिळखिळे होईपर्यंत देश पिंजून काढला; अखेर 24 वर्षांनी बापाने लेकाला शोधलंच)
सिंह रास
सिंह राशीचे लोक आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. सिंहेच्या जातकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांना एखाद्या गटात राहणं आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे असावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांच्या आवडी देखील तशाच असतात. महागड्या वस्तू त्यांना आकर्षित करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.