मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /3 राशीचे लोक असतात अतिशय बुद्धिमान; कधीच पहावं लागत नाही अपयशाचं तोंड

3 राशीचे लोक असतात अतिशय बुद्धिमान; कधीच पहावं लागत नाही अपयशाचं तोंड

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) काही राशीचे लोक इतके हुशार असतात की त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं.

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश (Success) मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट (Struggle) केले तरी आपयशी ठरत असतात. प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या स्वभावाची आणि वेगळ्या विचारांची असते तशीच प्रत्येकाची बुद्धिमत्ता (Intelligent) आणि समजदारी देखील वेगवेगळी असते.

कोणाला एखादी गोष्ट पटकन समजून घेता येते तर, काही व्यक्तींना तिच गोष्ट समजायला जास्त वेळ लागतो. म्हणजेच प्रत्येकाचा आयक्यु (IQ) वेगळा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार 3 राशीच्या (Zodiac Sing)  व्यक्ती जन्मताच बुद्धिमान असता. पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी.

(श्रावणातल्या उपवासासाठी नक्की खा हा पदार्थ; आहेत बरेच फायदे)

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. बुद्धीच्या जोरावर आपलं करियर घडवतात. हे लोक हट्टी आणि जिद्दी आता त्यामुळे मनावर घेतलेली गोष्ट करूनच गप्प बसतात. कुंभ राशीचे लोक आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात. ते दयाळू स्वभावाचे असता इतरांना मदत करण्यात त्यांना आनंद मिळतो.

(झाडासाठी खत आणि सजावटीसाठीही उपयोगी कॉफी बिया; घरात पडून असल्यास अशा वापरा)

मकर रास

मकर राशीचे लोक देखील बुद्धिमान असतात. त्यांच्यात सकारात्मकता भरलेली असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःवरचा ताबा हरवत नाही. त्यामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो. अडचणीमध्ये मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात.

(आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी)

कन्या रास

कन्या राशीचे लोक बिनधास्त स्वभावाचे असतात. सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करतात. शिवाय चतुर असल्यामुळे कोणत्याही अडचणीच्या प्रसंगातून स्वतःची सुटका करू शकता. दुसऱ्यांच्या वागण्याचा अंदाज पटकन लावून त्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark