नवी दिल्ली,13 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार
(According to Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट केले तरी आपयशी ठरत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी
(12 Zodiac Sing) मधील 5 राशीच्या मुली अतिशय टॅलेंटेड
(Talented) असतात. त्यामुळेच या मुलींना समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. याशिवाय लग्नानंतर आपल्या पतीकडून देखील प्रेम आणि रिस्पेक्ट मिळतो. या राशीच्या मुलींचा आकर्षक स्वभाव आणि बुद्धीमत्ता सगळ्यांनाच त्यांच्याकडे खेचून घेते.
वृषभ रास
वृषभ राशीच्या मुली अतिशय मेहनती असतात. त्या नेहमीच परफेक्शन आणि बॅलन्सवर काम करतात. या राशीच्या मुली मल्टिटास्किंग असतात. आपलं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या याच गुणामुळे सगळेजण यांचं कौतुक करतात.
(
वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय)
मिथुन रास
मिथुन राशीच्या मुली लहानपणापासूनच हुशार असतात. त्यामुळेच उच्च स्थान निर्माण करतात. कितीही संकटं आली तरी लढण्याची त्यांच्यामध्ये ताकत असते. याशिवाय मिथुन राशीच्या मुलींचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो. त्यामुळे त्यांचा सहवास सगळ्यांना हवाहवासा वाटतो.
(
कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका)
कन्या रास
कन्या राशीच्या मुली बुद्धिमान असतात. प्रत्येक कामांमध्ये यश मिळवतात. घरकाम असो किंवा ऑफिस कुठल्या ठिकाणी त्या कमी पडत नाहीत. भविष्यातल्या गोष्टींचा अंदाज लावण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग चांगलं असतं.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या मुली देखील अतिशय टॅलेंटेड असतात. ज्या क्षेत्रात जातात त्या ठिकाणी उच्च स्थान प्राप्त करतात. या महिलांकडे तर्कशास्त्रात ज्ञान चांगलं असतं. समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये कौतुकास पात्र ठरतात.
(
4 राशींच्या व्यक्तींचा वीकेंड उत्तम जाणार, पाहा आज तुमच्या राशीत काय?)
कुंभ रास
कुंभ राशीच्या मुली कमी वयातच चांगलं करिअर घडवतात. आपल्या आयुष्याबद्दल अतिशय गंभीर असतात. त्यामुळे ठरवलेल्या टार्गेट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करतात आणि आयुष्यात मानसन्मान आणि चांगलं पद मिळतात.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.