मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

5 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी; 11 ऑक्टोबरपर्यंत रहा सावध!

5 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी; 11 ऑक्टोबरपर्यंत रहा सावध!

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

ज्योतिषशास्त्रनुसार (Astrology) 5 राशीच्या लोकांना 11 ऑक्टोबरपर्यंत अडचणींचा काळ असणार आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 3 जुलै :  शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात. ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology)  शनिदेवांच्या (Shani Dev) अवकृपेमुळे अनेक राशींना  (Zodiac Signs)  समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या शनिदेव वक्री आहेत. शनिदेवाच्या वक्री स्थितीचा अशुभ परिणाम (Negative Effect) मिथुन, तुला,धनु,मकर आणि कुंभ राशीवर असणार आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत शनिमहाराज वक्रदृष्टीत असल्याने या काळात 5 राशीच्या लोकांना अडचणींचा (Difficulties) सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात खास सावधानता बाळगावी लागेल. जाणून घेऊयात या 5 राशींची 11 ऑक्टोबरपर्यंत कशी परिस्थिती असेल.

मिथुन रास

मिथुन राशीवर सध्या पनौतीचा प्रभाव आहे. ज्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना शनिचा अशूभ परिणाम पाहायला मिळणार आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत शनिच्या अवकृपेमुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे विचारपूर्वक पैसा खर्च करा.

(शनिदेवांना प्रिय असून या 3 राशीत सुरू आहे साडेसाती)

तुळ रास

तुळ राशीसाठी हा काळ पनौतीचा आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत तुळ राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. या काळात आर्थिक स्थिती कमजोर राहिल शिवाय मानसिक ताण देखील सहन करावा लागेल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव आहे. धनु राशीची सध्या साडेसाती सुरू आहे. त्यामुळे 11 ऑक्टोबरपर्यंत धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत. आरोग्यासंबंधी समस्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद-विवाद संभवतात.

(साप्ताहिक राशीभविष्य : कुणाला धनलाभ, कुणाला प्रवास योग; कसा असेल तुमचा हा आठवडा?)

मकर रास

मकर राशीची सुद्धा साडेसाती सुरू आहे. साडेसातीमुळे 11 ऑक्टोबरपर्यंत मकर राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात शिवाय नोकरी आणि उद्योगधंद्यामध्ये नुकसान होऊ शकतं.

(पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या टीप्स फॉलो करा बिलकुल खराब होणार नाही)

कुंभ रास

कुंभ राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्या उद्भवणार आहेत. आरोग्यासंबंधी अडचणी असतील आणि कामात अतिशय मेहनत करावी लागेल. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark