• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • Astrology: शुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी

Astrology: शुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (Astrology) 4 राशीच्या लोकांना शुक्राच्या प्रभावामुळे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतील.

 • Share this:
  दिल्ली, 23 जून : ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology)  शुक्राने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानलं जातं. आयुष्यातील आनंद, सुखसुविधा, भौतिक सुखं शुक्राच्या कृपेमुळेच आपल्याला मिळतात. 22 जूनला शुक्र मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये प्रवेश करता झाला आहे. आता 17 जुलै 2021 पर्यंत शुक्र कर्क राशीमध्ये असेल. शुक्राच्या या स्थितीचा परिणाम बाराही राशीवरती (Zodiac Signs) होणार आहे. मात्र 4 राशींना जास्त त्रास होणार आहे. जाणून घेऊयात त्या 4 राशी. सिंह रास सिंह राशीच्या लोकांना शुक्राच्या प्रभावाचं चांगलं फळ मिळणार आहे. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांना चांगला फायदा होईल. विदेशवारीची इच्छा असणाऱ्या लोकांना या कालावधीमध्ये संधी मिळू शकते. मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक संतुलन बिघडू शकतं. कौटूंबिक आयुष्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. स्वतःवर ताबा ठेवून वादविवादात न पडण्याचा सल्ला दिला जातोय. (प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक) कन्या रास कन्या राशीत शुक्राच्या प्रभाने कौटुंबिक आयुष्यात घडामोडी घडणार आहेत. या काळात तणावपूर्ण वातावरण असेल. भावंडांबरोबर वाद, कौटुंबिक वाद यामुळे आयुष्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. स्पर्धा परिक्षा  देणाऱ्या लोकांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. एखादा पुरस्कारही मिळू शकतो. सार्वजनिक आयुष्यामध्ये देखील यश मिळणार आहे. मित्रांची मदत मिळेल, मित्रांबरोबर संबंध सुधारतील. आर्थिक लाभ मिळणार आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात धनसंपत्ती वाढणार आहेच पण, प्रेम संबंधांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. (हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे 'डॉग मीट फेस्टिव्हल') तूळ रास तुळ रासही शुक्राची रास आहे. पण, शुक्राच्या प्रभावामुळे मानसिक त्रास उद्भवू शकतात. आयुष्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये चढ-उतार पहावे लागतील. आर्थिक चणचण भासेल आणि त्यामुळे मानसिक ताण वाढतील खर्चावर नियंत्रण ठेवा. कामामध्ये व्यस्त राहायल. प्रचंड मेहनत करावी लागेल. मेहनतीला घाबरून कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जात आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. जोडीदाराबरोबर वाद होतील जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा आणि सामंजस्याची भूमिका घ्या. आरोग्यावर देखील वाईट परिणाम दिसून येणार आहेत. (इथं महिला नाही तर चक्क पुरुष सांभाळतात चूल; दिलं जातं स्पेशल ट्रेनिंग) वृश्चिक रास शक्राच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. या काळामध्ये धन संपत्तीमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. लोकांना मदत कराल, आत्मपरीक्षण करण्याची देखील संधी मिळणार आहे. त्यामुळे आपलं वैयक्तिक आयुष्य सुधारेल. करियरचा काळ अनुकूल असेल. व्यवसाय करणाऱ्या शुक्र राशीच्या लोकांना शुभ फळ मिळणार आहेत. घरासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: