मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

4 राशीच्या लोकांची Immunity असते कमजोर; कुठल्या आजारांपासून असतो धोका?

4 राशीच्या लोकांची Immunity असते कमजोर; कुठल्या आजारांपासून असतो धोका?

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology) 4 राशीच्या लोकांची इम्युनिटी (Immunity) कमजोर असते.त्यामुळे सतत आजारी पडतात.

    नवी दिल्ली,25 जून : आपलं खाणंपिणं आहार आणि लाईफस्टाईल याचा परिणाम आपल्या इम्युनिटीवरती होत असतो. मात्र, आपल्या राशीचाही परिणाम इम्युनिटीवरती (Immunity)  होतो हे तुम्हाला माहिती आहे का ? ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology)  काही राशीँची इम्युनिटी कमजोर असते. तर, काही राशींची इम्युनिटी इतकी मजबूत असते की त्यांना लवकर व्हायरल इन्फेक्शन होत नाही. इम्युनिटी कमजोर असलेल्या राशींचे लोक लवकर आजारी पडतात. वातावरण बदलाचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. 12 राशींपैकी 4 अशा राशी (Zodiac Signs) आहेत ज्यांची इम्युनिटी कमजोर असते. वृषभ रास वृषभ राशीचे लोक तसे तर, स्वभावाने दृढनिश्चयी असतात. मात्र, त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते. ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हट्टी स्वभावाचे असल्यामुळे इतरांनी इम्युनिटी चांगली करण्यासाठी आहार किंवा व्यायाम करण्याचा सल्ला जरी दिला तरी त्याकडे ते दुर्लक्ष करतात. (लग्नात येत आहे अडचणी?;‘या’ वास्तू उपायाने होईल दोष दूर) वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेमध्ये लवकर आजारी पडतात. त्यांची इम्युनिटी कमजोर असते. त्यांना सतत आजारपण येत नसलं तरी देखील एखादा मोठा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लोकांनी नेहमीच आपल्या आहाराची काळजी घ्यावी. (या तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता) धनु रास धनु राशीच्या लोकांना भटकंती करायला फार आवडतं आणि त्यामुळेच त्यांना आजारपण येण्याची शक्यताही जास्त असते. हे लोक काही सवयीच्या बाबतीत अतिशय निष्काळजी असतात. आरोग्याची काळजी मुळीच घेत नाहीत. त्यामुळे त्यांची इम्युनिटी कमजोर असते. (रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer) मीन रास मीन राशीचे लोक अति विचारी असतात. त्यामुळे चिंता आणि स्ट्रेस यांचा त्यांच्या आरोग्यावर लवकर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा मूड देखील सतत खराब राहतो. यामुळे त्यांच्या इम्युनिटीवरही परिणाम होतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

    पुढील बातम्या