मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक

प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (Astrology) 4 राशीच्या लोकांना चांगला जोडीदार मिळतो. प्रेमाच्या बाबतील ते खूप लकी (Lucky zodiac signs) असतात.

नवी दिल्ली, 23 जून : आपल्याला प्रत्येकाला परफेक्ट लाईफ पार्टनर (Perfect Life Partner) हवा असतो. जो आपल्यावर प्रेम करेल, आपली काळजी घेईल, आपली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकेल, दुःखात आधार देईल, सुखात सहभागी होईल मात्र, प्रत्येकाला असा जोडीदार मिळेल असं नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) एखादी व्यक्ती प्रेमात यशस्वी होणार की नाही हे त्यांच्या जन्मपत्रिकेवरुन देखील ठरतं. या व्यक्तींचा जन्म कोणत्या नक्षत्रामध्ये झालेला आहे. कोणत्या ग्रहांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.

त्यानुसार त्या व्यक्तींचा स्वभाव (Nature) त्यांचं वागणं, यश आणि लग्नाही ठरतं ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी (Zodiac Signs) प्रत्येक राशीला प्रेमसंबंधांमुळे मिळणारं यश वेगवेगळं असू शकतो. शिवाय नक्षत्रांचाही प्रभाव पडतो. काही राशींचे जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा आपलं प्रेम (Love) इमानदारीने निभावतात. त्यांना चांगला जोडीदार मिळतो आणि ते सुखाने आयुष्य जगतात. 12 राशींपैकी 4 अशा राशी आहेत ज्या प्रेमाच्या बाबतीत लकी असतात. जाणून घेऊयात त्या राशी.

(गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास)

मिथुन रास

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक फारच प्रेमळ असतात. ते आपल्या जोडीदारावर अतिशय प्रेम करतात आणि आयुष्यभर आपलं नातं निभावतात. जेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रेम येतं तेव्हा, आपल्या जोडीदरावर जीव तोडून प्रेम करतात. मिथुन राशीचे लोक आपलं नातं वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार असतात.

कर्क रास

कर्क राशीचे लोक पूर्णपणे आपल्या पार्टनरला समर्पित असतात. ते इमानदारीने आणि निष्ठेने आपलं नातं निभावतात. आपल्या जोडीदाराची काळजी घेतात. कर्क राशीच्या लोकांनी एकदा एखाद्या व्यक्तीला आपल्या मनात स्थान दिलं तर आयुष्यभर आढळ राहते. त्यांची प्रेमात कोणतीही हद्द पार करण्याची तयारी असते.

(अगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक)

कन्या रास

कन्या राशीचे लोक कोणाबरोबर आपल्या मनातल्या बावना शेअर करत नाहीत. मात्र, प्रेमात अतिशय इमानदारीने करतात. ते आपल्या जोडीदारामधेच आपला मित्र शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या पार्टनर बरोबरच मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करतात. प्रेमात पडल्यावर ती व्यक्ती मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.

(पालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी)

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक अतिशय भावनाप्रधान असतात. आपलं आयुष्य आपल्या मतांवर जगतात मात्र, आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी कोणतंही कॉम्प्रमाईज करायला तयार असतात. त्यामुळे आपलं प्रेमाचं नातं निष्ठेने निभावतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle