नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: ज्योतिषशास्त्रात शनी (shani) देवाला न्याय देवता म्हणतात. माणसाच्या कर्मानुसार शनिदेव त्याला तसं फळ देतात असं मानलं जातं. शनी मकर राशीत 23 मे 2021 पासून उलट दिशेने म्हणजे वक्री फिरत आहे. शनी वक्री (curve) झाल्याने अनेक राशीच्या व्यक्तींवर त्याचे परिणाम झाले. अनेकांचा अडचणींचा सामना करावा लागला; मात्र आता त्यांच्या अडचणी समाप्त होतील.
पुढील महिन्यात म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शनी मार्गी होणार आहे. त्यानंतर अनेक राशींना (zodiac signs) याचे शुभ परिणाम अनुभवास मिळतील. अनेकांचा शनिदोषामुळे होणारा त्रास दूर होईल; मात्र काही राशींसाठी हा काळ कठीण असेल. याबाबतची माहिती ‘आज तक’ने दिली आहे.
साप्ताहिक राशीभविष्य: तुम्ही या 4 पैकी एका राशीतले असाल तर आठवडा असेल तुमचाच!
शनीची चाल सरळ होत असल्याचा कोणत्या राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊ या. ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते, शनीची चाल सरळ झाल्यामुळे धनू राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होईल. शनीची साडेसाती संपून या राशीच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होईल. याशिवाय मकर, कुंभ राशीच्या व्यक्तींच्याही समस्या कमी होतील. दुसरीकडे शनी वक्री झाल्याने अडचणींचा सामना करावा लागलेल्या मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना दिलासा मिळेल. मेष, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होईल.
शनीची चाल बदलणं किंवा राशी बदलणं ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. शनी हा संथ गती असलेला ग्रह आहे. तो अडीच वर्षांत एका राशीतून दुसऱ्या राशीत आपलं स्थान बदलतो. शनीने रास बदलल्यामुळे त्या त्या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात उलथापालथ सुरू होते. शनिदेव 2020पासून मकर राशीत आहेत. या राशीमध्ये 23 मे 2021 पासून त्यांची चाल वक्री आहे. आता शनीची चाल बदलणार आहे, अशी माहिती आज तकमध्ये ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांंच्या हवाल्याने दिली आहे.
Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या 'या' गोष्टींची काळजी; वाचा....
शनीची चाल बदलल्याने मीन राशीच्या व्यक्तींचा शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. तसंच कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर शनीची अवकृपा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे.
शनिदेव महादशा, अंतर्दशा, साडेसाती आणि पनवती या काळामध्ये व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनीला अतिशय प्रभावी ग्रह मानलं गेलं आहे. 9 ग्रहांपैकी शनीच्या अवकृपेचे दुष्परिणाम सगळ्याच राशींना भोगावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.