मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: 3 राशींना आजचा दिवस आहे चांगला; या राशीने सांभाळून निर्णय घ्या

राशीभविष्य: 3 राशींना आजचा दिवस आहे चांगला; या राशीने सांभाळून निर्णय घ्या

आज  मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर 2021.  भाद्रपद चतुर्दशी. आजचा दिवस कुठल्या राशीसाठी आहे चांगला आणि कुणी राहायचं सांभाळून वाचा दैनंदिन राशीभविष्य..

आज मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर 2021. भाद्रपद चतुर्दशी. आजचा दिवस कुठल्या राशीसाठी आहे चांगला आणि कुणी राहायचं सांभाळून वाचा दैनंदिन राशीभविष्य..

आज मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर 2021. भाद्रपद चतुर्दशी. आजचा दिवस कुठल्या राशीसाठी आहे चांगला आणि कुणी राहायचं सांभाळून वाचा दैनंदिन राशीभविष्य..

आज  मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर 2021.  भाद्रपद चतुर्दशी .चंद्र दिवसभर कन्या राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य .

मेष

आज दिवस थोडा संथ आहे. नवीन काम, निर्णय टाळा  आर्थिक स्थिती ठीक राहील. पण कोणाला उधार देणे टाळा. शत्रू पासून सावध रहा. नातेवाईकांना भेट किंवा फोन होईल. दिवस मध्यम जाईल. अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सांभाळून राहण्याची गरज आहे.

वृषभ

आज मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलांना समजून घेणे आवश्यक राहील  नवीन कला,विद्या  शिकण्यास अनुकूल दिवस. मानसिक ताणतणाव कमी होतील.  दिवस चांगला जाईल.

मिथुन

चंद्राचे  चतुर्थ स्थानात भ्रमण असणार आहे. आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन अडचणी येतील. काही बदल झाले तर स्वीकार करा. आर्थिक स्थिती ठीक राहील. घराकडे लक्ष देणे गरजेचे राहील  दिवस शुभ आहे.

कर्क

तृतीय स्थानात आता  चंद्र रवि बुध  मंगळ असे चार ग्रह आहेत . बहीण भावाशी संवाद किंवा भेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. संतती सुख चांगले. प्रवास योग येतील. दिवस सर्वसामान्य पणे जाईल.

सिंह

आज आर्थिक भरभराट  होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून प्राप्तीचे योग आहेत. फार अपेक्षा नकोत. वाद होतील. नवीन काही सुरू करणे टाळा.. दिवस चांगला.

कन्या

आज राशीतील  चार ग्रह ताण  तणाव निर्माण करतील. दिवस अस्वस्थ पार पडेल. राशीत आलेला मंगळ, बुध त्वचा रोग निर्माण करेल.रागीट स्वभाव होईल.  धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम.

तुला

प्रकृतीची काळजी, मानसिक ताण, आणि थकवा असा आजचा दिवस आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येऊ शकते. राशी च्या धन स्थानातील शुक्र सुखद  आर्थिक लाभ देणार आहे.  ईश्वरी उपासना करावी. दिवस मध्यम जाईल.

वृश्चिक

घरात होणार्‍या अवाजवी खर्चाला आता  कात्री लावणे गरजेचे  आहे. लाभ स्थानातील चंद्र भ्रमण आज काही मित्रांची भेट घडवून आणेल. संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये संभाळून निर्णय घ्या.  दिवस प्रवासाचा  आहे..

धनु

आजचा दिवस ऑफिस मध्ये  जास्तीची जबाबदारी, ताण आणि काही आवश्यक निर्णय घेण्याचा आहे. घराकडे लक्ष द्या.  जोडीदाराची साथ  लाभेल. एकूण मिश्र दिवस आहे.

मकर

भाग्य स्थानातील चंद्र, रवि मंगळ, बुध ग्रह उत्तम भाग्याची साथ  मिळवून देतील. छोटे प्रवास किंवा त्याची आखणी, असा हा दिवस आहे. भावंडाची साथ मिळेल. राशीतील शनि मुळे निराशा येते. उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. धार्मिक कार्य घडेल. शुभ दिवस.

कुंभ

आज दिवस संथ, कंटाळवाणा जाईल. अमावास्या चिंतेची. अष्टमात चार ग्रह जपून राहण्याचे संकेत देत आहे. जास्तीची कामे त्रास देतील. शरीर साथ देणार नाही. गृह चिंता सतावू  शकते. पत्नीच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी खर्च होईल. जपून रहा  असा संकेत आहे.

मीन

तुमचे  आपल्या जोडीदाराशी सूर जुळतील. मात्र सप्तम स्थानात आलेला  चंद्र मंगळ, बुध ,रवि काळजीपूर्वक रहा असे सुचवत आहे.जोडीने  प्रवास, खरेदी कराल  मुलांची उत्तम प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल  दिवस चांगला जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya