• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मंगळाच्या राशीभ्रमणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

राशीभविष्य: मंगळाच्या राशीभ्रमणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

आज दिनांक 22 ऑक्टोबर 2021 शुक्रवार आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करणार असून मंगळ तुला राशीत प्रवेश करेल. याचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

  • Share this:
आज दिनांक 22 ऑक्टोबर 2021,शुक्रवार आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करणार असून मंगळ तुला राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे  भविष्य. मेष राशी स्थानात असलेला चंद्र ,सप्तम सूर्य अतिशय शुभ असुन पराक्रम, बुद्धिमत्ता, संभाषण कला ,यात वाढ करेल.  तुमच्या बुद्धी आणि वाणी चातुर्याने तुम्ही सगळ्यांना जिंकून घेणार आहात. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ आहे. वृषभ पंचमात असलेला   बुध शैक्षणिक क्षेत्रात भरघोस मदत करील. कुटुंब सुख, उच्च विचार व संभाषण चातुर्य यात वाढ होईल. राशीतील राहू व व्ययस्थानातील चंद्र आजही मानसिक ताण व अस्वस्थता निर्माण करतील. दिवस मध्यम जाईल. मिथुन आज चतुर्थ स्थानात असलेल्या  बुधाची स्वराशी कन्या असल्याने घर व वाहन यासंबंधी शुभ फळ देईल. घरांमधे समारंभ होईल. तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल.  लाभ स्थानातील चंद्र शुभ फळ देणारा आहे.  दिवस ठीक आहे. कर्क तृतीय स्थानात  बुध गुरू सोबत राजयोग करीत असून परदेश गमन, त्यासंबंधी  सर्व  कागदपत्रे,आणि प्रवास  यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरी, व्यवसाय पूरक आहे. फक्त थोडे खर्चावर नियंत्रण ठेवावे. लाभदायक दिवस. सिंह राशी च्या  तृतीय स्थानात येणारे  रवि  मंगळ शुभ फळ आणि उत्तम लाभ  देतील .मैत्रिणी  किंवा  बहिणी तुम्हाला  उत्तम सल्ला देऊन  फायदा करून देतील. शिक्षण, परीक्षा  याकरता शुभ  काल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती  सुखावह राहील. खर्च बेताने करा. गुरु कृपेचा लाभ घ्या. कन्या राशी स्वामी बुध उच्च राशीत ,अष्टमात चंद्र आहे. नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ काळ आहे. नवीन संधी, हाती घेतलेल्या कामात यश, प्रमोशन, असा हा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. शुभ घटनांना आता सुरवात होईल.दिवस चांगला. तुला आज व्यय स्थानात  असलेले बुध मंगळ खर्चाचे नवीन दरवाजे उघडणार आहे.  शुक्र अचानक लाभ,परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश   देईल. शुभ  दिवस  आहे. धर्मा बद्दल आस्था वाढेल. शुभ कार्य घडतील. वृश्चिक सध्या झालेले  बुधाचे   कन्या राश्यांतर  लाभ स्थानात आहे . वृश्चिक व्यक्तींना जाणवणारा निरुत्साह संपून नवीन  जोश येईल.सखोल अभ्यास सुरू होऊन यश मिळेल. गृह सजावट,आर्थिक घडामोडी  यांना प्राधान्य मिळेल.  षष्ठ चंद्र  मध्यम फळ  देईल. दिवस चांगला. धनु दशम स्थानात  बुध  राश्यांतर  फार चांगले फळ देणार असून भागीदारी मध्ये सामंजस्य निर्माण करेल. करार यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. संतती सुख उत्तम. षष्ठ स्थानात असलेला राहू  शत्रू वर विजय मिळवून देईल. दिवस शुभ आहे. मकर राशीच्या दशमातील रवि मंगळ नोकरीत नवीन संधी, नातेवाईकांशी  भेट, त्यापासून काही त्रास असे फळ देतील. मुलाखतीतून यश मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. संतती चिंता कमी होईल. दिवस चांगला. कुंभ अष्टमात उच्च बुध ,सर्व तर्‍हेने शुभ फल देणारा आहे  .आर्थिक प्राप्ती, संतती सुख  मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी होईल. घराकडे लक्ष  द्यावे लागेल. शुभ दिवस. मीन सातव्या स्थानातील बुध शुभ असुन ,जोडीदार, कुटुंब  ही तुमची प्राथमिकता राहणार.  नवीन वास्तूचे स्वप्न सत्यात येईल.प्रवास योग येतील. चिडचिड करू नका. महत्त्वाचा फोन येईल.नवीन संधी प्राप्त होतील. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published: