• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: कोजागरी पौर्णिमा या राशींसाठी आहे भाग्यकारक

राशीभविष्य: कोजागरी पौर्णिमा या राशींसाठी आहे भाग्यकारक

आज दिनांक 19 ऑक्टोबर 2021 मंगळवार ,आज अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी. साडेसाती असणाऱ्या तीन राशींसाठी आजची पौर्णिमा काय घेऊन येणार?

  • Share this:
आज दिनांक  19  ऑक्टोबर 2021  मंगळवार ,आज अश्विन पौर्णिमा . कोजागिरी. आज चंद्र दिवसभर मीन राशीत असेल. पाहूया  आजचे राशीभविष्य . मेष दुपारनंतर दिनमान  अनुकूल होईल.आर्थिक व्यवहार जपून करा.  मन थोडे अस्वस्थ राहील. जोडीदाराची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. दिवस  चांगला आहे . वृषभ आज दुपारनंतर मानसिक अशांती  वाढेल.   चंद्र   सूर्य  दोन दिवस काळजी घ्या असे  सुचवतो आहे. मोठे  निर्णय  टाळा. उपासना करा. पौर्णिमा अस्वस्थ मनस्थिती मध्ये जाईल. मिथुन राशीच्या  दशमातील चंद्र भ्रमण  राहू व सूर्य. ग्रहमान अनुकूल. गुरु महाराज साथ देतील. प्रकृती ला जपावे .आर्थिक व्यवहार टाळावे. पौर्णिमा कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. कर्क दिवस  शुभ  संकेत  देतो आहे. भाग्य कारक योग होतील. मित्र  मैत्रिणीशी संवाद  साधा. मीन राशीतील  चंद्र चांगले  फळ  देईल. चतुर्थ मंगळाचा  जप करा. ओम अं.अंगारकाय नम: प्रकृतीची काळजी घ्या. सिंह आज  विचित्र घटना  अचानक वाढतील .दिवस  मध्यम आहे  . मंगल  प्रकृतीच्या  किरकोळ  तक्रारी  निर्माण करेल. पौर्णिमा  मानसिक उद्रेकाची.  जपून रहा. कन्या अचानक  दोन दिवसानंतर मन शांत  व स्थिर होईल .कामात मन रमेल. दिवस  भाग्य कारक आहे. कुठूनतरी शुभ वार्ता कळतील. गुरु  स्मरण  करावे. पौर्णिमा मौजमजा करण्याचा संकेत..देत आहे. तुला मंगळवारचा दिवस तुला राशीच्या  व्यक्तींसाठी सांभाळून राहण्याचा  आहे. ग्रहांचे  सहकार्य  मिळणे  कठीण आहे. दिवस  शांततेत घालवा .मोठे निर्णय  लांबणीवर  टाका. ओम  सोम  सोमाय नम: जप  करणे  फायद्याचे  ठरेल. वृश्चिक आज  संततीला वेळ द्यावा लागेल. दुपारनंतर  कामांना वेग येईल. दिवस  अनुकूल आहे  राशीत असलेला केतू  आध्यात्मिक रुची  निर्माण करेल. शारीरिक  व्याधी  कडे  लक्ष  द्या. ओम  रं.राहवे  नमः  जप करा. धनु राशीच्या धनस्थानातील  शनी, साडेसाती इत्यादींनी धनु व्यक्ती बेजार आहेत. मंगळवार फारसा अनुकूल नाही. भाग्यात मंगळ आहे. मंगळाची  उपासना  करावी. पौर्णिमा लाभदायक. घरात विशेष घटना घडतील. मकर मकर व्यक्ती साडेसातीमुळे  त्रासले आहे, पण आता थोडी अनुकूलता मिळेल. मुलांकडे लक्ष द्या.  विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे.  शनी  उपासना करावी. पौर्णिमा प्रवास योग आणेल. कुंभ आजचे ग्रहमान  अनुकूल असून साडेसाती असली  तरी  गुरुकृपेने निभावून जाल. आर्थिक व्यवहार जपून करा. घरासंबंधित काही कामे असतील तर उरकून घ्या...दिवस  चांगला आहे. मीन आपल्या राशीला  सध्या  रवि अष्टमात आहे.  जप सुरू ठेवावा. दुपारनंतर  फोन, भेटी गाठी ,छोटे  प्रवास  संभवतात. महत्त्वाचा कामे  उरकून घ्या. मुलांची  काळजी घ्या. दिवस चांगला  आहे. हे होते मंगळवारचे  बारा  राशींचे भविष्य. शुभम भवतु !
First published: