राशीभविष्य: मकर, मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्या; कुठल्या राशीला आजचा दिवस उत्तम वाचा..

बुधवार दिनांक 16 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध षष्ठी या दिवशी चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. कसा असेल आजचा दिवस 12 राशींसाठी...

बुधवार दिनांक 16 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध षष्ठी या दिवशी चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. कसा असेल आजचा दिवस 12 राशींसाठी...

  • Share this:
आज बुधवार 16 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध षष्ठी. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करेल. सोमवारपासून आपण दैनंदिन राशीभविष्याबरोबर दररोज एका राशीचा स्वभाव जाणून घेतो आहोत. प्रत्येक राशीच्या व्यक्तींमध्ये गुण-दोष असतातच. पण त्यांचं असं खास व्यक्तिमत्त्वसुद्धा असतं. आज वृषभ राशी विषयी माहिती घेऊ या. वृषभ रास ही पृथ्वी तत्त्वाची, स्थिर, शुभ रास असून स्वामी शुक्र आहे. राशीचे  चिन्ह वृषभ  म्हणजे बैल  हे आहे. राशीचा अंमल  चेहरा, गळा  यावर असतो. या राशीच्या व्यक्ती देखण्या, भरदार बांधा असलेल्या, मोठे बोलके  डोळे अणि मोठे दात अशा असतात. हसर्‍या, कलासक्त  पण आत्मकेंद्री. खूप कष्ट  करण्याची तयारी असते. अनेक कलाकार या राशीत जन्माला येतात. शुक्र या राशीत उच्चीचा होतो. चंद्र ही शुभ असतो. ओम  शु.शुक्राय नम : जप करावा. आता पाहू या आजचे  बारा राशींचे भविष्य.. मेष पंचमात होणारे चंद्र भ्रमण  अनेक बाबतीत  शुभ आहे. मुले मनासारखी वागतील. त्यांना थोडा वेळ द्या. आधी  केलेल्या काहीतरी  छान कामा मुळे प्रसिद्धी  होईल. दिवस  अनुकूल  आहे. वृषभ थोडी  पिछेहाट झाली तरी धैर्याने काम पूर्ण करा. घरगुती काम अचानक वाढतील. नको असलेले खर्च टाळा. जरा  डोळ्यांची काळजी घ्या. चैनीकडे कल होईल. दिवस चांगला आहे मिथुन प्रवास अगदी लहान का असेना, होण्याची शक्यता आहे. बहीण भावाशी संवाद करणे आज गरजेचे आहे. त्यांना महत्व द्या. राशीत आलेला सूर्य व शुक्र अधिकार  बहाल करेल. दिवस उत्तम. कर्क आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, कर्जफेड, असा हा दिवस आहे. काही नुकसान होणार नाही असे बघा. अष्टमात असलेला गुरू थोडी संथ प्रगती करतो. पण सतर्क अणि आनंदी रहा. सिंह दिवस शांततेत, नियमित असा जाईल. फार  घडामोडी होणार  नाहीत. कायद्याचे चौकट ना मोडता  सावध राहून व्यवहार करा. गुरु  कुटुंबात समाधान निर्माण करेल .दिवस चांगला  आहे. कन्या प्रकृती जरा  नरम गरम,शिथिल  राहील. काही  पोटाचे त्रास असतील  तर दुर्लक्ष नको. अधिकारी व्यक्तीशी संभाषण किंवा भेट घडू  शकते.  गुरूची उपासना करावी. दिवस मध्यम आहे. तुला आज केलेल्या कामाचा  लाभ मिळण्याची शक्यता आहे. दशमातील मंगळ कामाच्या ठिकाणी तुमचे महत्व  वाढवेल. ताण पडला तरी  यश मिळेल. दिवस  शुभ आहे. वृश्चिक कामाच्या  पद्धतीत थोडा बदल करून बघा. म्हणजे त्रास होणार नाही. थोडे इतरांच्या म्हणण्याला महत्त्व द्या. जोडीदाराला वेळ द्या. अष्टमात आलेला सूर्य  प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवतो. दिवस चांगला आहे. धनु भाग्यवान रास. आज अनेक शुभ घटना घडतील. पूजेत मन रमेल .फक्त  शनी मंगळ प्रतियोग असताना काळजी घेणे  गरजेचे असते. दिवस छान आहे. मकर आज मकर राशीच्या व्यक्तींसाठी दिवस  फारसा अनुकूल  नाही. मनावर असलेले  नैराश्याचे मळभ आज अधिक वाढेल. पण धीर सोडू नका. लवकरच सगळे ठीक होईल. मुलांची काळजी घ्या. दिवस  मध्यम. कुंभ आज दोघांनी विचार विनिमय करून काही  निर्णय  घ्यायचे असतील  तर  घ्या. एकमेकांना वेळ द्या. कौटुंबिक प्रश्न असतील  तर ते  आधी सोडवा. दिवस  चांगला आहे. मीन प्रकृतीची काळजी घ्या  असे आजचे  चंद्र भ्रमण सुचवते आहे. मुल  ही सध्या तुमची काळजी आहे. पण फार ताण घेऊ नका. लवकर प्रश्न सुटतील. गुरूची उपासना करणे फायद्याचे आहे. दिवस  मध्यम आहे. शुभम भवतु..
First published: