• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • सप्टेंबर महिन्यात अनेक राशींमध्ये होणार ग्रहबदल; काय होतील याचे परिणाम?

सप्टेंबर महिन्यात अनेक राशींमध्ये होणार ग्रहबदल; काय होतील याचे परिणाम?

सप्टेंबर महिन्यातली ग्रहस्थिती काय सांगते पाहा...राशींमधील संक्रमणामुळे येतील वेगळे अनुभव.

  • Share this:
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर: भारतीय संस्कृतीत ग्रह (Planets), तारे (Star horoscope) यांना विशेष महत्त्व आहे. ग्रह, ताऱ्यांवर आधारित ज्योतिषशास्त्रात (Astrology for septemeber) याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. चंद्राच्या गतीवर आधारीत राशीचक्र तयार करण्यात आले असून, कुंडलीच्या (Horoscope) आधारे प्रत्येक राशीत असलेल्या ग्रहांच्या बदलानुसार मानवी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचे अंदाजही वर्तवले जातात. प्रत्येक रास आणि ग्रह यांचा परस्पर संबंध, त्याचे परिणाम याबाबत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगू शकतात. प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतील संक्रमणाचा (planet Transit) कालावधी निश्चित असतो. तर प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह ठरलेला असतो. ग्रह प्रत्येक महिन्यात आपली राशी बदलतात. त्यानुसर त्या राशीवर परिणाम होतात. ग्रहांच्या संक्रमणाची घटना काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. आता सुरू होणाऱ्या या वर्षातील नववा महिना म्हणजे सप्टेंबरमध्येही अनेक ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत. त्यानुसार कोणत्या राशीत कोणता ग्रह प्रवेश करणार आहे, याबाबत जनसत्ता डॉट कॉमने वृत्त दिलं आहे. तूळ राशीत शुक्राचे संक्रमण: शुक्र (Venus) ग्रह 6 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12:39 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल आणि 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत तो या राशीमध्ये राहील. यानंतर शुक्र मंगळाच्या राशीत म्हणजे वृश्चिक राशीत संक्रमण करेल. कन्या राशीत मंगळाचे संक्रमण: 6 सप्टेंबरला शुक्र ग्रहासोबतच मंगळाचेही (Mars) संक्रमण होईल. या दिवशी मंगळ ग्रह दुपारी 3:21मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल आणि 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1:13पर्यंत राहील. यानंतर तो तूळ राशीत संक्रमणास सुरुवात करेल. मकर राशीमध्ये गुरुचे संक्रमण: मकर राशीतील गुरूचे (Jupiter) संक्रमण 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11:43 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर 2021पर्यंत तो याच राशीमध्ये राहील. यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. कन्या राशीत सूर्याचे संक्रमण: 17 सप्टेंबर 2021 रोजी 1:29 मिनिटांनी सूर्य (Sun) कन्या राशीत प्रवेश करेल आणि 17 ऑक्टोबरपर्यंत या राशीमध्ये राहील. यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल. साप्ताहिक राशीभविष्य: 3 राशींना आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल, तुमचा आठवडा कसा जाईल तूळ राशीत बुध ग्रहाचा प्रवेश : 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8:42 मिनिटांनी बुध (Mercury) ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल आणि 2ऑक्टोबर 2021 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. बुध वक्री : बुध ग्रह 27 सप्टेंबरपासून वक्री होईल आणि 18 ऑक्टोबर रोजी मार्गी लागेल. बुध ग्रहाचा वक्री असण्याचा कालावधी 22 दिवसांचा असेल. या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना ठरणार संकटाचा काळ; पाहा तुमची रास तर नाही ना यात? वेगेवेगळ्या ग्रहांच्या वेगवेगळ्या राशींमधील संक्रमणामुळे ती रास असणाऱ्या व्यक्तीलाही वेगळे अनुभव येतील. राशीतील ग्रह बदल हा त्याच्या भविष्यातही बदल घडवतो. त्याचे भाकीत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ पत्रिकेतील ग्रहांच्या स्थानावरून सांगू शकतात. प्रत्येक राशीसाठी ग्रहांचे स्थान महत्त्वाचे असते. त्यानुसार त्या राशीत स्थित्यंतरे अनुभवास येतात.
First published: