मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : Ashadi Ekadashi च्या निमित्ताने आज करा दानधर्म; तुमच्या जन्मतारखेनुसार काय दान करणं फायद्याचं पाहा

Numerology : Ashadi Ekadashi च्या निमित्ताने आज करा दानधर्म; तुमच्या जन्मतारखेनुसार काय दान करणं फायद्याचं पाहा

Numerology 10 July 2022 : आजच्या दिवशी तुमच्या जन्मतारखेनुसार काय दान करणं तुमच्या फायद्याचं ठरेल हे अंकशास्त्रात दिलं आहे.

Numerology 10 July 2022 : आजच्या दिवशी तुमच्या जन्मतारखेनुसार काय दान करणं तुमच्या फायद्याचं ठरेल हे अंकशास्त्रात दिलं आहे.

Numerology 10 July 2022 : आजच्या दिवशी तुमच्या जन्मतारखेनुसार काय दान करणं तुमच्या फायद्याचं ठरेल हे अंकशास्त्रात दिलं आहे.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

करिअरमध्ये नव्याने सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रवास आरामात पार पडतील. आज आर्थिक प्रगती चांगली होईल, तसंच टार्गेट पूर्ण होतील. तुमची हुशारी आणि ओळख यांचा फायदा होईल. खेळाडूंना मोठं यश मिळेल. तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीची ओळख होईल. महिलांच्या स्वयंपाक कौशल्याची छाप पडेल. आज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढेल. गुरूचे आशीर्वाद फायद्याचे ठरतील.

शुभ रंग : Yellow and Orange

शुभ दिवस : रविवार आणि गुरुवार

शुभ अंक : 3

दान : कृपया सूर्यफुलाचं तेल दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज आशावादी राहा आणि समोर येणारी सर्व कामं पार पाडा; यश नक्की मिळेल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा उत्तम समतोल साधता येईल. आज नातेवाईकांसोबत आणि मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. लिक्विड, शिक्षण, साहित्य, फायनान्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषध, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, सोलर एनर्जी, शेती, पेट्रोल आणि केमिकल्स या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भरपूर फायदा संभवतो.

शुभ रंग : Blue and Orange

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया गायींना आणि भिक्षेकऱ्यांना पाणी दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगला आहे. त्यामुळे तुमची कौशल्यं आणि ज्ञान इतरांसमोर सादर करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी भरपूर यश मिळवण्याचा दिवस. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; मात्र आपल्या मार्गदर्शकाचे आभार मानायला विसरू नका. गोड बोलून तुमच्या जोडीदाराचं मन जिंकाल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला लग्नाची मागणी घालण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकाची भरपूर मदत होईल. राजकीय नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांना जनतेचं लक्ष आपल्याकडे आकर्षून घेण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षा किंवा मुलाखत देण्यापूर्वी गुरूमंत्राचा जप करावा. महिलांनी आज पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ बनवून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालावेत. यामुळे गुरू ग्रहाची शक्ती वाढेल.

शुभ रंग : Orange and Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : कृपया मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भविष्याकरिता चांगल्या योजना तयार करण्यासाठी उत्तम दिवस. तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येकांना फायदा होईल. आजचा दिवस मॅनेजमेंटचा आहे. डिफेन्स क्षेत्रातल्या व्यक्ती, हॉटेल व्यावसायिक, प्रॉपर्टी डीलर्स, उत्पादक, टेलिकॉम आणि आयटी क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासाठी भरपूर फायद्याचा दिवस. आज गुंतवणूक केलेल्या पैशांचा परतावा मिळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, हे लक्षात घ्या. आजचा बराचसा वेळ प्लॅनिंगमध्ये जाईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. आज शाकाहार करणं उत्तम. थोडा वेळ आपला छंद जोपासण्यासाठी राखून ठेवा.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

गणपतीचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. सध्या सर्व गोष्टी तुमच्या सोयीने होत आहेत. विशेषतः राजकीय नेते आणि व्यावसायिकांसाठी भाग्याचा दिवस. तुमच्या सहकाऱ्यांपासून आज सावध राहा. त्यांच्याजवळ कोणतीही खासगी गोष्ट बोलू नका. ग्लॅमर, मीडिया, विदेशी वस्तू व्यापार आणि खेळ या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना विशेष अप्रैझल मिळेल. बैठकीमध्ये Teal रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आज कृपया पार्टी आणि मांसाहार टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. खेळाडूंना मोठं यश मिळेल.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया लहान मुलांना हिरवी द्राक्षं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मास मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आज मोठी संधी चालून येईल. तुम्हाला उत्तम जोडीदार मिळाला आहे, याबाबत देवाचे आभार मानाल. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. तुम्हाला आज कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांचा भरपूर पाठिंबा मिळेल. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन उत्तम होतील. जोडीदारासोबत काही वेळ व्यतीत कराल. रोमँटिक रिलेशनशिप चांगली राहील. सरकारी टेंडरमध्ये रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. गाडी, मोबाइल किंवा घर खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. एखाद्या छोटेखानी सहलीचं आयोजन करण्यासाठीदेखील चांगला दिवस. शेअर मार्केट गुंतवणूक फायद्याची ठरेल. राजकारण आणि अभिनय क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज आलेली ऑफर सोडू नका.

शुभ रंग : Blue and Peach

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया अनाथाश्रमात दूध दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस अगदी उत्साहाचा आहे. मेडिकल चेकअप करण्यास सांगितलं असल्यास ते सायंकाळी करावं. आज कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा. तसंच वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करा. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला ऐका. पैशांची योग्य बचत करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. सॉफ्टवेअर आणि राजकारणाशी संबंधित बिझनेस व्यवहार सुरळीत पार पडतील. यासाठी तुमची ओळख फायद्याची ठरेल. विवाहासाठी योग्य जोडीदार चालून येईल. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास समाधान मिळेल.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया गरिबांना किंवा मंदिरात धातूची भांडी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचे विचार आणि कृती यांचा ताळमेळ बसणार नाही. त्यामुळे तणाव राहील. एखाद्या गोष्टीतून सुटका करून घेण्यासाठी बुद्धीचा आणि पैशांचा वापर करा. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा पैशांची मदत होईल. बिझनेस व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमच्या ओळखींचा फायदा होईल. जोडीदारासोबत विसंवाद झाल्यामुळे तक्रारी होत राहतील. विद्यार्थ्यांनी आज स्पर्धेला उपस्थित राहताना गडद रंगाचे कपडे टाळावेत. खेळाडूंनी घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. आज प्रवासाचे बेत असल्यास ते टाळावेत वा पुढे ढकलावेत. दानधर्म करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरजूंना चपला दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज मोठे निर्णय घेणं फायद्याचं ठरेल. विशेषतः तुम्ही कलाकार असाल तर कोणताही निर्णय तुमच्यासाठी योग्यच असेल. जोडप्यांनी फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी उत्तम दिवस. सरकारी कंत्राट आणि व्यवहार सुरळीत पार पडतील. सॉफ्टवेअर, एअरलाईन, ग्लॅमर, गूढविद्या, संगीत, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकारणात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांना एखादं पद मिळण्याची शक्यता आहे. सभा घेण्यासाठी आणि मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्तम दिवस. संगीतकार व्यक्तींच्या पालकांना त्यांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन यांना बक्षीस मिळेल. प्रवासाचे बेत यशस्वीपणे पार पडतील.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया डाळिंबं दान करा.

10 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सुनील गावसकर, राजनाथ सिंह, परवीन सुलताना, आलोक नाथ, सोफिया वर्गारा

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology