मुंबई, 29 डिसेंबर : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून मेष राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries)
जानेवारी :
सर्वसाधारण : नव्या महिन्यात घोषणांचा पाऊस पडणार आहे. एखादी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारण्याच्या आधी तुम्हाला चौकशी करावीशी वाटेल. प्रकृतीच्या किरकोळ समस्या असतील; मात्र त्यांच्याकडे तातडीने लक्ष द्यावं लागेल. आध्यात्मिक सहल लवकरच घडण्याची शक्यता आहे.
रिलेशनशिप : या बाबतीत गोष्टी थोड्या संथ गतीने होतील. एखादी व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांचं आकर्षण तुम्हाला आता कमी वाटू लागण्याची शक्यता आहे. गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर थेट लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
करिअर : कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन तुम्हाला नवी जबाबदारी देण्याकरिता विश्वासार्ह समजेल. आता तुम्हाला तुमच्याकडे सध्या असलेल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करायला हवी. तुमचं प्रमोशन ड्यू असेल, तर तुम्हाला तुमच्यासाठी काही चांगल्या संधी विकसित व्हायला सुरुवात झाल्याचं दिसून येईल.
लकी रंग : Deep Red
फेब्रुवारी :
सर्वसाधारण : या महिन्यात तुम्हाला जोखीम पत्करावीशी वाटेल. ऊर्जा लवचिक असेल आणि पत्करलेली कोणतीही जोखीम सकारात्मक ठरू शकेल. तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये विनाकारण घडणाऱ्या काही घडामोडींमुळे तुम्हाला खूप ताण आल्यासारखं वाटू शकेल. तुमच्यापैकी काही जणांना छोटा ब्रेक घ्यावासा वाटू शकेल.
रिलेशनशिप : या बाबतीत सकारात्मक हालचाल दिसू शकेल. ज्या जुन्या रिलेशनशिपमुळे तुम्हाला मानसिक जखमा झाल्या आहेत, त्या रिलेशनशिपमुळे आता तुम्ही आणखी अडचणीत येणार नाही किंवा आणखी त्रास होणार नाही. तुमच्या पार्टनरच्या वर्तणुकीमुळे तुम्ही दुखावले गेले असलात, तर ते न लपवणं श्रेयस्कर.
करिअर : एखाद्या दीर्घकालीन उद्दिष्टाच्या जवळ पोहोचल्यासारखं वाटेल. सहकाऱ्याला विनाकारण स्पर्धा करावीशी वाटेल. महत्त्वाच्या चर्चेतून तुम्हाला बाजूला ठेवलं गेल्यासारखं वाटेल.
लकी रंग : Mauve
मार्च :
सर्वसाधारण : एखाद्या छोट्या ग्रुपमधल्या व्यक्तींच्या मनावर तुम्ही मोठा प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबी पूर्ण करण्यात तुमचा सर्वाधिक वेळ जाऊ शकतो. बदल घडण्याची शक्यता आहे; मात्र तुम्हाला अद्याप त्याबद्दल खात्री वाटत नाहीये. एखाद्याच्या तुमच्याबद्दलच्या विचारांचे संकेत कळल्यामुळे तुमच्या बाह्य रूपात बदल घडवाल.
रिलेशनशिप : आतापर्यंत तुम्ही ज्या व्यक्तीचा तिरस्कार करत होतात, त्या व्यक्तीच्या तुम्ही कदाचित प्रेमात पडण्याची शक्यता आहे. विवाहित असलात, तर दोघांमध्ये तणाव अजिबात नसेल. कमिटेड नसलात, तर तुमच्या वैयक्तिक वेळेपेक्षा जास्त प्राधान्य अन्य कोणाला देऊ नका.
करिअर : एखादी नवी कल्पना तुम्हाला प्रोजेक्ट सबमिशनच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवेल. नोकरीत नवे असलात, तर तुमच्यावर लक्ष ठेवलं जात आहे याची मनाशी खूणगाठ बांधा. कामाच्या निमित्ताने आउटिंगची शक्यता आहे.
लकी रंग : Canary Yellow
एप्रिल :
सर्वसाधारण : अचानक काही असाइनमेंट्स द्याव्या लागणं आणि त्यासाठी रात्री जागवाव्या लागणं घडू शकतं. काही काळ न मिळालेली कायदेशीर परवानगी आता मिळू शकेल. फॅमिली सेलिब्रेशनसाठी प्लॅन आखाल. एखाद्या नव्या व्यक्तीशी भेट होऊ शकेल. त्या व्यक्तीशी तुमचे संबंध दीर्घ काळ राहू शकतील.
रिलेशनशिप : तुमचा प्रवास सध्या 'गुंतागुंतीपासून' 'सहन करण्यापर्यंत' असा असेल. सुलभता असेल; मात्र थोडासा त्रासही असेल. अन्य कोणाच्या तरी नकारात्मकतेचं उदाहरण तुमच्या मनावर प्रभाव पाडू शकेल.
करिअर : थोडीशी निराशा असू शकेल. काही काळासाठी गोष्टी तुमच्या नियोजनानुसार घडणार नाहीत; पण सध्याचा काळ नव्या आणि मजबूत बिझनेस रिलेशनशिप्स तयार करण्याचा आहे.
लकी रंग : Match Green
मे :
सर्वसाधारण : अचानक मिळालेल्या मीटिंगच्या संधीतून काही तरी इंटरेस्टिंग आणि ठोस साध्य होऊ शकेल. तुमच्या संवेदना तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील. कायदेशीर मार्गदर्शक सूचनांमुळे एखादी महत्त्वाची गोष्ट अडकू शकेल. विशेषाधिकाराचा वापर करण्यासाठी तुमची वेळ येईपर्यंत तुम्हाला संयमाने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
रिलेशनशिप : तुमच्या जोडीदारासोबतच्या नातेसंबंधांमध्ये थोडं वादळ येण्याची शक्यता आहे. गैरसमजांमुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आहे. तुमचं खरं मत व्यक्त करणं काही वेळा रिस्की असू शकेल. त्यासाठीची वेळ महत्त्वाची आहे.
करिअर : तुम्ही ज्या कामाची कमिटमेंट केली आहे, ते नियंत्रणाखाली आहे. एखादी पार्टनरशिप होण्याची शक्यता आहे. आताच्या टप्प्यावर ती करावी अशी शिफारस केली जात आहे. कामाचा ताण लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.
लकी रंग : Tangerine
जून :
सर्वसाधारण : या महिन्यात शांतता आणि एकांताचे काही घटक असू शकतील. फॅमिली टाइम आणि रिलॅक्सेशनच्या कल्पना तुमच्या मनावर परिणाम करू शकतील. एखादा दूर राहणारा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकेल. शेजारचं कोणी तरी किरकोळ अडचणी निर्माण करू शकेल.
रिलेशनशिप : लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये असलात, तर तुम्हाला पार्टनरचे नवे पैलू कळतील. गेट-टुगेदर किंवा पार्टीला उपस्थित राहिलात, तर काही नवे स्पार्क्स दिसतील. तुमच्या भावना दाबून टाकणं हा चांगला पर्याय नाही.
करिअर : रेकग्निशन आणि रिवॉर्ड्स खूप असतील; मात्र त्या प्रत्येकासाठी तुम्ही पात्र आहात. एखादा नवा विरोधक सध्या तुमचं निरीक्षण करत राहण्याचा निर्णय घेऊ शकेल. ऑर्गनाइज्ड पेपरवर्कमुळे वेळ वाचेल.
लकी रंग : Violet
जुलै :
सर्वसाधारण : तुम्ही इतरांना जज करत असणाऱ्या व्यक्ती असलात, तर तुमची वर्तणूक चुकीची ठरवली जाईल. नवं ज्ञान मिळवण्यासाठी, तसंच स्वतःला अपग्रेड करण्याची इच्छा प्रकर्षाने होईल. तुमच्या आजूबाजूची एखादी कुशल व्यक्ती तुम्हाला प्रेरक ठरेल. या काळात आर्थिक वृद्धी हळूहळू होत असेल.
रिलेशनशिप : एखाद्याला कायम कमाडिंग पोझिशनमध्ये ठेवणं चांगलं नाही. तुम्हाला सध्याच्या रिलेशनशिपमध्ये नियंत्रणात असल्यासारखं वाटेल. एखादा मित्रत्वाचा सल्ला दीर्घ काळ उपयोगी पडू शकेल.
करिअर : तुम्हाला सध्याच्या रोलमध्ये अनेकदा घुसमटल्यासारखं वाटत असेल. परदेशातली एखादी संधी तुमच्यसमोर येऊ शकेल. अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करत असाल आणि मोठी झेप घेण्यास अद्याप सज्ज नाही आहात.
लकी रंग : Fuchsia Pink
ऑगस्ट :
सर्वसाधारण : तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी तुम्ही प्रेरक व्यक्तिमत्त्व असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्या व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागू शकतील. एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या चांगल्या नेटवर्कमध्ये सहभागी होऊ शकेल. तुमच्यापैकी काही जणांना थोड्या दिवसांचा ब्रेक घ्यावासा वाटू शकेल.
रिलेशनशिप : तुमच्या जोडीदाराला संवादात काही अडचणी असू शकतील. तुम्हाला छुपे मुद्दे कदाचित पूर्णतः माहिती नसतील; पण वेळ आल्यावर ते वर येतील. ते सोडवणारे तुम्ही पहिले ठराल.
करिअर : तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीच्या अनुषंगाने पार्श्वभूमी तयार केली जात असल्याचं तुम्हाला दिसू शकेल. तुम्ही कदाचित प्रयोगाचा विचार करत असाल. त्याच जुन्या कामासाठी नव्या दृष्टिकोनाचं स्वागत कराल.
लकी रंग : Hazelnut Brown
सप्टेंबर :
सर्वसाधारण : हा वर्षाचा असा काळ आहे, ज्यात अधिक निरीक्षण करून त्यावर कृती नंतर करावी. सर्व पातळ्यांवर नियोजनाचा गोंधळ असू शकेल. तुमच्यापैकी काही जणांना कोलॅबोरेशन करावंसं वाटू शकेल; मात्र त्यासाठी घाई करू नका. प्रकृतीच्या काही किरकोळ समस्या उद्भवू शकतील, खासकरून पोटाशी निगडित.
रिलेशनशिप : तुम्हाला अखेर एकमेकांबद्दल पुन्हा खात्री पटेल. भूतकाळात काही गैरसमज झाले असतील, तर ते आता अस्तित्वात नसतील. तुमच्या कमिटमेंटबद्दल तुम्ही या वर्षी दीर्घ वाटचाल केली आहे.
करिअर : तुमचं शेड्यूल खूप बिझी असेल; मात्र मन शांत असेल. वाढीच्या संधी आतापर्यंत स्पष्ट झालेल्या नाहीत. पूर्वीच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती आता अधिक स्थिर वाटू शकेल.
लकी रंग : Maroon
ऑक्टोबर :
सर्वसाधारण : तुमचे आई-वडिलांशी अनेक वाद होऊ शकतील. भावंडांचाही त्यांनाच पाठिंबा असेल. अनेक अनावश्यक बाबींमुळे तुम्ही व्यग्र राहाल. एखादी छोटी ट्रिप घडण्याची शक्यता आहे.
रिलेशनशिप : कोणाबद्दलही कमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या. कारण ते विनाकारण दुखावले जाण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराला असं वाटत आहे, की तुम्ही त्यांच्या विचारांबद्दल अधिक संवेदनशील व्हावं. अचानक झालेल्या मतभेदांमुळे तुम्हाला कदाचित मार्ग वेगळे करावेसे वाटू शकतील.
करिअर : तुम्ही काम करत असलेली एखादी गोष्ट हलगर्जीपणामुळे लीक होऊ शकेल. तुम्हाला या दिवसांत स्वतःबद्दल फारसं चांगलं वाटणार नाही, तसंच ऊर्जाही कमी असल्यासारखी वाटेल. महिन्याच्या उत्तरार्धात खात्रीने नव्या आणि सकारात्मक घडामोडी घडतील.
लकी रंग : Royal Blue
हे वाचा - नववर्षात सूर्यदेवांची स्वारी निघालीय या उच्च राशीत! कोणाचं पालटणार नशीब?
नोव्हेंबर :
सर्वसाधारण : या महिन्यात सेलिब्रेशन्स आणि कौटुंबिक गेट-टुगेदर्स होतील. तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक उत्साही वाटेल. काही जुन्या केसेस तुम्ही स्वतःच्या ताकदीवर सोडवाल. कुटुंबात विनाकारण काही नाट्य पाहायला मिळेल. एखादी किरकोळ चोरी होण्याची शक्यता आहे. दक्ष राहा.
रिलेशनशिप : कोणत्याही वादानंतर तुमचा पार्टनर तुमच्या कोषात यायचा प्रयत्न करील. ही बाब मनात असू द्या. सिंगल असलात, तर कामाच्या ठिकाणी एखादी आकर्षक व्यक्ती सापडू शकेल. तुमचा साधेपणा इतरांना भुरळ घालू शकेल.
करिअर : नवे आणि वेगळे निर्णय घेण्यासाठी सध्याचा काळ सकारात्मक आहे. काही वेळा तुमचे वरिष्ठ तुमच्या उणिवा दाखवतील आणि सुधारणा सांगतील. एखाद्या युनिक बिझनेस अपॉर्च्युनिटीमुळे तुम्हाला उत्साही वाटू शकेल.
लकी रंग : Deep Purple
हे वाचा - शुक्राचे होणार राशी परिवर्तन; या 4 राशीच्या लोकांचे वाढणार इनकम सोर्स
डिसेंबर :
सर्वसाधारण : तुमच्या खऱ्या भावना काय आहेत, हे कदाचित तुम्ही बोलून दाखवणार नाही. तुमच्या स्वतःच्याच अटिट्यूडमुळे अनेकदा तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यासारखं तुम्हाला वाटेल. काही वेळ एकांतात व्यतीत करण्याची तीव्र इच्छा होऊ शकेल. प्रवासाचा एखादा इंटरेस्टिंग पर्याय समोर येऊ शकतो.
रिलेशनशिप : दाबून ठेवलेल्या भावनांबद्दल बोलणं होईल. त्यातून सर्व प्रलंबित मुद्दे सोडवले जातील. छोट्या जागेत कोंडलं जाण्याची भीती भूतकाळात तुम्हाला अनेकदा वाटत होती. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या रिलेशनशिपला कदाचित मान्यता देणार नाही.
करिअर : प्रोफेशनली तुम्हाला अनेकदा कॉन्फिडंट वाटत नाही. तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्रोतांतून कदाचित मार्गदर्शन घ्यावं लागेल. आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला स्पर्धात्मक वाटू शकेल.
लकी रंग : Liliac
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark