मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आज Angarki Chaturthi; तुम्हाला काय लाभ होणार पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज Angarki Chaturthi; तुम्हाला काय लाभ होणार पाहा

Angarki Chaturthi Horoscope : चैत्र शुक्ल चतुर्थी. अंगारकी चतुर्थीचा तुमचा दिवस कसा जाणार?

Angarki Chaturthi Horoscope : चैत्र शुक्ल चतुर्थी. अंगारकी चतुर्थीचा तुमचा दिवस कसा जाणार?

Angarki Chaturthi Horoscope : चैत्र शुक्ल चतुर्थी. अंगारकी चतुर्थीचा तुमचा दिवस कसा जाणार?

आज दिनांक 05 एप्रिल 2022 वार मंगळवार. चैत्र शुक्ल चतुर्थी. अंगारकी चतुर्थी. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. तिथून तो शनि मंगळाशी नवपंचम योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष चंद्र आज मान आशंकित ठेवेल. जोडीदाराची चिंता हळूहळू कमी होईल. आर्थिक प्राप्ती होईल. दिवस शांततेत घरी घालवा. शारीरिक ताण घेऊ नका. दिवस बरा आहे. वृषभ आज राशीतील चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. प्रवास होतील. मित्रमैत्रिणी भेटतील. मंगळ शनी सावधगिरीचा इशारा देत आहे. आर्थिक घडामोडी होतील. दिवस शुभ आहे . मिथुन राशी स्वामी बुध मीन राशीत रवीसोबत आहे, आता बरेच मार्ग सुलभ होतील. सरकारी काम, कागदपत्र लिखाण यात यश मिळेल. संतती सुख मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. कर्क आज राशीच्या लाभ स्थानात चंद्र असून दैवी संकेत मिळतील. मंगळ प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. थोडे नैराश्य वाटेल पण खंबीर रहा. दिवस उत्तम. सिंह आज चंद्र भ्रमण प्रवासी असून प्रकृती ठिक राहिल. मन थोडे उदास राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत रहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस मध्यम. कन्या आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघे मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. तूळ चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात.आर्थिक व्यवहार आज नकोच. शांततेत दिवस घालवा. वृश्चिक जोडीदाराला काही वेळ आज द्यावा लागणार आहे. कुटुंबाची काही जबाबदारी तुमच्यावर येईल. मन आनंदी राहिल. खर्च जपून करा. दिवस शुभ. धनु आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं वाटेल. दिवस शुभ. मकर राशीतील शनी मंगळ तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावतील. पंचम चंद्र खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. खर्च जपून करा. दिवस बरा. कुंभ आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावं लागेल. दिवस शुभ. मीन राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र घरामध्ये जास्तीची काम येतील. भटकंतीचे योग येतील. पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या