नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : सूर्याला नवग्रहांचा राजा मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology) व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ऊर्जा आणि ताकत सूर्याच्या कृपेने प्राप्त होते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य शुभ भावांमध्ये असेल त्याला विविध क्षेत्रांमध्ये उच्च पद आणि मानसन्मान प्राप्त होतात. दर 30 दिवसांनी सूर्य राशी परिवर्तन करतो. 17 ऑगस्ट 2019ला मंगळवारी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना (Zodiac Sing) शुभ फळ (Effect) मिळणार आहे. पाहुयात त्या भाग्यवान राशी.
मेष रास
सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेलं कोणतंही सहज मार्गी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम मानला जातो. कमी काळामध्ये जास्त ज्ञानप्राप्ती होईल. आर्थिक आघाडीवर देखील हा काळ चांगला असणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये पैशांची आवक वाढेल याशिवाय अनेक मार्गाने पैसा येईल.
(IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा)
तुळ रास
तुळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. विरोधकांचा नायनाट करण्यात यश मिळेल. आर्थिक अडचणी संपतील. नोकरीमध्ये पगारवाढीची शक्यता आहे. व्यापारामध्ये अधिक फायदा मिळेल. आर्थिक आवक वाढल्यामुळे नवीन काम हाती घेण्याच्या संधी प्राप्त होतील.
(आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास)
वृश्चिक रास
सुर्य राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीचा आत्मविश्वास वाढणार आहे. प्रत्येक कार्यात सहजपणे यश मिळेल. आपलं ध्येय्य सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल. प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हा काळ फायदेशीर ठरणार आहे. शत्रू हार मानतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल.
(‘या’ एकाच राशीला ऑगस्टमध्ये भाग्यवान होण्याची संधी; शुक्र कृपेने वाढणार संपत्ती)
वृषभ रास
सूर्याचं राशी परिवर्तन धैर्य वाढवणारं ठरणार आहे. कार्यक्षेत्रात सहजपणे यश मिळेल. वरिष्ठ कामाचं कौतुक करतील. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाड्यांवर फायदा होईल धनलाभाच्या संधी मिळतील. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.