नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : खरं तर मंगळ (Mars) हा ग्रह काही राशींसाठी शुभ फळ (Positive Effect) देणारा आहे. मात्र, कोणत्याही ग्रहाचा अस्त अशुभ फळ देणारा असतो असं मानलं जातं. पण, ग्रहांच्या अवस्थाचा परिणाम काही राशींसाठी (Zodiac Sing) लाभदायक ठरू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) 17 ऑगस्टला मंगळग्रह अस्ती झाल्याने काही राशींना शुभ फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे. मंगळ शौर्य, शक्ती आणि संपत्तीचा कारक आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह शुभ स्थानी आहे. त्यांच्यासाठी हा ग्रह सुख देणारा आहे. या ग्रहाच्या परिणामामुळे अडचणींवर सहजपणे मात करता येते. पण, अस्त झाल्यावर हा ग्रह कमी प्रभावी असतो. काही राशीच्या अडचणी वाढू शकतात. मंगळ अस्ताचे काही राशींवर चांगले परिणाम होणार आहे. पण, काही राशींना मंगळ अस्त कशाप्रकारे शुभ फळ देणारा आहे पाहुयात.
वृश्चिक रास
या राशीसाठी मंगळ ग्रहाचा अस्त लाभदायक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी संपणार आहेत. आर्थिक अडचणी असतील तर, पैसा येण्याचे मार्ग मिळतील. जुन्यातल्या जुन्या समस्या संपून कौटुंबिक सुखदेखील मिळेल. घर किंवा वाहन खरेदीचं योगही तयार होत आहेत. त्यामुळे घर आणि वाहन खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.
मिथुन रास
या राशीचे लोक आधीपासून आर्थिक अडचणीमध्ये आहेत. मात्र आता मंगळाच्या अस्तामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी संपणार आहेत. कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणार आहेत. एकूणच मंगळ ग्रहाचा अस्त मिथुन राशीसाठी शुभ फळ देणारा ठरणार आहे.
मकर रास
मकर राशीसाठी मंगळ ग्रहाचा अस्त शुभ फळ देणारा आहे. मंगळ राशीच्या व्यक्तींना शारीरिक अडचणी असतील तर आता त्रास थांबणार आहे. हा काळ वाहन खरेदीसाठी चांगला मानला जातोय. त्यामुळे वाहन खरेदीची इच्छा असेल तर, नवीन वाहन खरेदी करू शकता. आर्थिक अडचणी असतील आणि येणारे पैसे अडकले असतील तर व्यवहारासाठी हा काळ उत्तम आहे. अडकलेले पैसे देखील मिळतील. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.