मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

मंगळ ग्रहाच्या अस्ताने 5 राशींसाठी अडचणींचे संकेत; पुढचे 3 महिने धोक्याचे

मंगळ ग्रहाच्या अस्ताने 5 राशींसाठी अडचणींचे संकेत; पुढचे 3 महिने धोक्याचे

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology)ग्रहमान बदल्यामुळे पुढच्या काही महिन्यात अनुकूल परिणाम काही राशींच्या व्यक्तींना भोगावे लागतील.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीनुसार (Zodiac Sing) त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. मंगळ ग्रहाचा परिणामही व्यक्तींच्या आयुष्यावर होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला क्रूर ग्रह मानलं जातं. 18 ऑगस्ट 2019 पासून 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत मंगळ ग्रह अस्त असणार आहे. अस्त स्थितीमध्ये मंगळ ग्रह 6 सप्टेंबर 2021ला सिंह राशी मधून कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 22 ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळ ग्रहाला पराक्रमाचा कारक मानलं जातं. पण, मंगळग्रह अस्त झाल्यामुळे काही राशी नव्हती वाईट परिणाम होणार आहेत. पाहूयात त्या राशी मेष रास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रहाच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातल्या अडचणी वाढणार आहेत. स्वतःचं मत इतरांना पटवून देणं कठीण जाईल. आत्मविश्वास कमी होईल. नवीन काम सुरू करण्याआधी वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्यावा. (अशी बदलंली परिस्थिती की,डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऋषिता गुप्ता झाल्या IAS) सिंह रास मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान आहे. आज पासून तो याच राशीमध्ये अस्त अवस्थेमध्ये राहिल. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अडचणी आल्या तरी त्यांच्यापासून सुटकाही होईल पण, मंगळ ग्रहाच्या अस्तामुळे प्रतिकूल परिणाम भोगावे लागणार आहेत. कन्या रास कन्या राशीच्या लोकांच्या पराक्रमामध्ये मंगळ अस्ताने कमी येणार आहे. कोणतंही आव्हान स्विकारण्याआधी दहा वेळा विचार करा. नाहीतर नुकसान भोगावं लागेल. आर्थिक देवाण-घेवाणांशी संबंधीत व्यवहारांमध्ये सावध राहावं. (स्वत:च्याच प्रेमात पडण्यात असते वेगळी मजा; कधी केलेत का हे उद्योग?) वृश्चिक रास मेष आणि वृश्चिक दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. मंगळ अस्त झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आव्हानं वाढणार आहेत. वाद-विवादांमध्ये पडू नये. सामाजात मानसन्मानांमध्ये अडचणी येतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांना मंगळ अस्तामुळे संकटांचा सामना करावा लागणार आहे. आयुष्यात चढ-उतार पहावे लागतील. व्यवसायामध्ये जास्त मेहनत करावी लागेल. (हे 5 घटक असतील रोजच्या आहारात तर, म्हातारपणात देखील केस गळणार नाहीत) तूळ रास तूळ राशीच्या लोकांना ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवनामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. याशिवाय अपघातात दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासात सावधानता बाळगावी. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या