• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • 22 सप्टेंबरनंतर काही राशींचा होणार भाग्योदय; पाहा तुमच्या राशीला मिळणार का फायदा

22 सप्टेंबरनंतर काही राशींचा होणार भाग्योदय; पाहा तुमच्या राशीला मिळणार का फायदा

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार सप्टेंबर महिना मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी लाभदायक आहे. नोकरी, व्यापाराता फायदा होईल, कौटुंबिक सुख मिळेल.

 • Share this:
  दिल्ली, 30 ऑगस्ट :  ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ग्रहांचे स्थान बदलण्याचा राशींवर  (Zodiac Sing)  परिणाम होत असतो. सप्टेंबर (September) महिन्यामध्ये काही ग्रह आपलं स्थान बदलणार आहेत. हे ग्रह दुसऱ्या राशींमध्ये स्थानापन्न झाल्यामुळे सगळ्याच राशींवर परिणाम (Effect) होणार आहे. मंगळ ग्रहाला शौर्य आणि पराक्रमाचा कारक मानला जातो या ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्ती धैर्यवान आणि पराक्रमी होतात. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे राशींवर परिणाम होत असतो. 6 सप्टेंबरला मंगळ ग्रह बुधची राशी म्हणजेच कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये मंगळ ग्रह 22 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मंगळ ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळ ग्रहाला मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानलं जातं. तर, या 2 राशींबरोबर इतर राशींवरही परिवर्तनाचा परिणाम होणार आहे आणि चांगले परिणाम मिळणार आहेत पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी. (चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन) मेष रास मेष राशीच्या लोकांना मंगळाच्या राशी परिवर्तनाने लाभ मिळणार आहे. या काळामध्ये मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामाचं कौतुक होईल. शत्रूंवर विजय प्राप्त होऊन आर्थिक लाभाचे योग तयार होतील. (बुद्धिदेवतेचे 'हे' 5 गुण आत्मसात केलेत, तर सहज गाठता येईल यशाचं शिखर) कर्क रास मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील. महत्वाची कामं करण्यासाठी हा काळ योग्य आहे. कार्यक्षेत्रामध्ये चांगले परिणाम मिळतील. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे आर्थिक आघाड्यांवर फायदा होणार आहे. लक्ष्मीची कृपा होऊन पदोन्नतीच्या संधी प्राप्त होतील. व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे भाग्योदय होणार आहे. कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. (अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाने हात धुताय? हे आधी वाचा, फायद्याऐवजी होऊ शकतं नुकसान) धनु रास धनु राशीवर मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे शुभ परिणाम दिसतील. आनंदवार्ता समजतील, आर्थिक फायदे होतील, अडकलेली कामं मार्गी लागल्यामुळे आनंदीआनंद होईल. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: