मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /यशाच्या शिखरावर नेणारं तंजेनाईट रत्न; वलयांकित आयुष्य जगाल

यशाच्या शिखरावर नेणारं तंजेनाईट रत्न; वलयांकित आयुष्य जगाल

नकारात्मक प्रभावामुळेच अनेक जण हे रत्न घालण्यास टाळाटाळ करतात.

नकारात्मक प्रभावामुळेच अनेक जण हे रत्न घालण्यास टाळाटाळ करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology) ग्लॅमरमध्ये राहण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने तंजेनाईट रत्न (Tanzanite Gemstones) धारण करावं. हे नीलम रत्नाचं उपरत्न आहे. शनीची कृपादृष्टी प्राप्त होते.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : शनी ग्रहाचा नकारात्मक प्रभाव (Negative Effect) कमी करण्यासाठी निलम (Neelam) रत्न वापरणं उपयोगी ठरतं. हे रत्न ज्याला लाभतं त्याला शुभ फळ मिळून यशाच्या शिखरावर पोहोचण्यास खूप जास्त फायदा होतो. ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology)  आणि रत्न शास्त्रांमध्ये नीलम रत्नाला अतिशय प्रभावी रत्न मानलं जातं. याच निलम रत्नाचा एक उपप्रकार आहे. ज्याला म्हणजे तंजेनाईट रत्न असं म्हटलं जातं. या रत्नांमध्ये शनी बरोबर मंगळाची देखील शक्ती असते. त्यामुळेच हे रत्न दोन ग्रहांवर प्रभाव टाकतं. या रत्नाला तंजेनाईट रत्न (Tanzanite Gemstones) म्हणजेच नीलम रत्नाचं उपरत्न म्हटलं जातं. याच रत्नाला ब्ल्यू नीलम असंदेखील म्हटलं जातं.

साधारण निळसर रंगाचं असणार या रत्नामध्ये लाल रंगाचे डाग दिसतात. हे रत्न अतिशय ताकदवान असतं आणि शुभफळ देणारं असतं. मात्र, एखाद्या व्यक्तीला अशुभ फळ मिळालं तर त्या व्यक्तीची वाताहत देखील होते किंवा जीवावारही बेततं. याच्या नकारात्मक प्रभावामुळेच अनेक जण हे रत्न घालण्यास टाळाटाळ करतात.

(‘ही’ चिन्ह शरीरावर असतील तर, ती मुलगी असेत Lucky; तुम्ही आहात का भाग्यवान?)

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या जन्म पत्रिकेमध्ये मंगळ आणि शनी ग्रह अनुकूल आहेत. अशा लोकांसाठी हे रत्न उपयोगी आहे. एखाद्या व्यक्तीला आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरायचं असेल तर, त्या व्यक्तीने म्हणजे तंजेनाईट रत्न धारण करावं. यामुळे शनीची कृपादृष्टी आणि शुभाशिर्वाद देखील मिळतात. शनीची साडेसाती, शनीची पनौती सुरू असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी हे रत्न धारण करण्याने फायदा होतो.

(15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास)

शिवाय आरोग्यही उत्तम राहतं. मात्र, हे रत्न धारण करण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तंजेनाईट रत्न प्लॅटिनम किंवा चांदीमध्ये धारण करावं. डावऱ्या व्यक्तींनी डाव्या हातात किंवा उजव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी उजव्या हातामध्ये याची अंगठी बनवून मधल्या बोटात धारण करावी. कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या शनिवारी संध्याकाळी ही अंगठी धारण करण्याने शुभ परिणाम मिळतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark